केळफुलाचीसाठी साहित्य
१ मध्यम आकाराचे केळफूल, १-२ कांदे (बारीक चिरलेले), कोथिंबीर, हिरवी मिरची, १ चमचा मोहरी, ८-१० कढीपत्ता पाने, १.५ चमचे आले-लसूण पेस्ट (ऐच्छिक), चवीनुसार मीठ, २-३ चमचे तेल, आवश्यकतेनुसार मसाले (हळद, लाल तिखट, गरम मसाला) हे साहित्य लागेल.
नोकरीपेक्षा शेती निवडली, पपई शेतीतून उच्चशिक्षित तरुणाची महिन्याला 4 लाखांची कमाई
advertisement
केळफूल बनवण्याची कृती:
केळफूल साफ करणे: केळफुलाचे बाहेरील जांभळे पाकळ्या काढून टाका. आतील पांढरा भाग आणि प्रत्येक पाकळीतील एक दांडा (तो कडक असतो) काढून टाका. हे सर्व बारीक चिरून घ्या आणि पाण्यात ठेवा.
चीक काढणे: चिरलेल्या केळफुलाला मीठ चोळून अर्धा तास झाकून ठेवा, यामुळे त्याचा चीक निघून जातो आणि भाजी कडू लागत नाही. नंतर स्वच्छ धुवून घ्यावे.
फोडणी देणे: एका कढईत तेल गरम करा. मोहरी, कढीपत्ता घालून तडतडू द्या.
कांदा परतणे: चिरलेला कांदा घालून तो लालसर होईपर्यंत परतून घ्या. त्यात कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून घ्यावे.
केळफूल घालणे: आता बारीक चिरलेले केळफूल घालून चांगले परतून घ्या आणि झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
मसाले घालणे: भाजी शिजत आल्यावर त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला (आवडीनुसार) आणि चवीनुसार मीठ घाला.
सर्व्ह करणे: गरमागरम केळफुलाची भाजी भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी तयार आहे.





