अळूवडी बनवण्यासाठी साहित्य
अळूची पाने – 7–8
बेसन – 1 कप
हळद, तिखट – प्रत्येकी ½ चमचा
धणे-जिरे पावडर – 1 चमचा
मीठ – चवीनुसार
तेल – तळण्यासाठी
कोथिंबीर- थोडीशी
लसूण- 5-6 पाकळ्या
आलं- थोडंसं
कढीपत्ता
Ganesh Chaturthi 2025: फुकट बनवा इको-फ्रेंडली बाप्पा! वापरा फक्त कुंडीतील माती, बघा VIDEO
advertisement
अळूवडी बनवण्यासाठी कृती:
1. अळूची पाने स्वच्छ धुवून घ्या आणि देठ काढून टाका. पानांची पाठीमागची नस थोडीशी खरवडून घ्या जेणेकरून वडी मऊसर होईल.
2. एका वाटीत बेसन, हळद, तिखट, धणे-जिरे पावडर आणि मीठ घालून त्यात लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं यांचा केलेलं मिश्रण घालून चांगले मिसळा. सोबत थोडंसं पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करा.
3. एक अळूचं पान पाठीमागून ठेवून त्यावर थोडं मिश्रण पसरवा. त्यावर दुसरं पान ठेवा आणि पुन्हा मिश्रण लावा. अशा प्रकारे 5–6 पानं एकावर एक लावून त्याची घडी घाला.
4. घट्ट रोल करून वाफेवर 15–20 मिनिटं शिजवून घ्या.
5. वाफेवर शिजल्यानंतर थंड होऊ द्या आणि त्याच्या जाडसर चकत्या कापा.
6. तव्यावर तेल गरम करून त्या चकत्या दोन्ही बाजूंनी तपकिरी होईपर्यंत तळा.
चहा बरोबर खाल्ल्यास किंवा जेवणात भातासोबत दिल्यास ही वडी खास चव देते. अळूच्या पानांमधील फायबर्स आणि घरगुती मसाल्याचा संगम ही वडी आरोग्यदृष्ट्याही फायदेशीर ठरते. आजच्या झटपट जीवनशैलीत अशी पारंपरिक पाककृती टिकवणं ही काळाची गरज ठरतेय.