Ganesh Chaturthi 2025: फुकट बनवा इको-फ्रेंडली बाप्पा! वापरा फक्त कुंडीतील माती, बघा VIDEO

Last Updated:

Ganesh Chaturthi 2025: अलीकडच्या काळात अनेकजण घरच्या घरी पर्यावणरपूरक गणपतीची मूर्ती तयार करण्याला प्राधान्य देतात.

+
Ganesh

Ganesh Chaturthi 2025: फुकट बनवा इको-फ्रेंडली बाप्पा! वापरा फक्त कुंडीतील माती, बघा VIDEO

छत्रपती संभाजीनगर : येत्या 27 ऑगस्टला सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यामुळे सध्या गणेशभक्तींची गणेशोत्सवाच्या तयारीसाठी लगबग सुरू आहे. अलीकडच्या काळात अनेकजण घरच्या घरी पर्यावणरपूरक गणपतीची मूर्ती तयार करण्याला प्राधान्य देतात. यासाठी शाडू मातीचा वापर केला जातो. मात्र, तुम्ही कधी कुंडीतल्या मातीचा गणपती तयार केलाय का? छत्रपती संभाजीनगरमधील मनीषा चौधरी, घरी असलेल्या झाडांच्या कुंडीतील मातीचा गणपती कसा तयार करायचा याचं मुलांना प्रशिक्षण देतात.
मनीषा चौधरी या 'दीपिका फाउंडेशन'च्या अध्यक्ष आहेत. त्या गेल्या पाच वर्षापासून संभाजीनगरमध्ये झाडांच्या कुंडीतील मातीचा गणपती तयार करण्याचं प्रशिक्षण देतात. यासाठी त्या अनेक कार्यशाळा घेतात. संभाजीनगरमधील अनेक शाळांमध्ये जाऊन त्यांनी शाळकरी मुलांना देखील प्रशिक्षण दिलं आहे. बाप्पाची मूर्ती तयार करण्यासाठी कुंडीतील माती कशी तयार करायची, त्यापासून मूर्तीला कसा आकार द्यायचा आणि तयार झालेली मूर्ती सुशोभित कशी करायची, अशा विविध गोष्टी मुलांना शिकवल्या जातात.
advertisement
मनीषा चौधरी यांनी आतापर्यंत 5000 पेक्षाही जास्त मुलांना गणपती बनवण्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यांचा या उपक्रमाला शासनाच्या आणि खासगी शाळांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. मनीषा म्हणाल्या, "शाडूच्या मातीपेक्षा आपल्या घरी असलेल्या झाडांच्या कुंडीतील माती अतिशय चांगली असते. तिचा आपण वापर केला तर अतिशय सुंदर गणपती बाप्पा तयार होतो. या बाप्पाचं विसर्जन तुम्ही घरीच करू शकता आणि तीच माती पुन्हा कुंडीमध्ये टाकू शकता. अशा पद्धतीने गणेशोत्सव एकदम पर्यावरण पूरक होतो."
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganesh Chaturthi 2025: फुकट बनवा इको-फ्रेंडली बाप्पा! वापरा फक्त कुंडीतील माती, बघा VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement