बीटरूट कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 बीट, 1 बटाटा, आवडीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ, चिमूटभर गरम मसाला, कोटिंग साठी जाडसर रवा, शॅलो फ्रायिंगसाठी तेल
हे साहित्य लागेल.
बीटरूट कटलेट बनवण्याची कृती
कटलेट बनवण्यासाठी बीटरूट प्रथम स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या. किसणीच्या साह्याने बारीक किसून घ्या. यानंतर उकडलेला बटाटा साल काढून किसून घ्या.
advertisement
Gavhachi Kheer Recipe: श्रावणात बनवा पारंपरिक गव्हाची खीर, यापद्धतीने होणार नाही खराब, Video
बीट आणि बटाट्याचा किस एकत्र एका भांड्यामध्ये काढून घ्यावा. त्या मिश्रणामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्या. मिश्रणावरती चवीनुसार मीठ, आवडीप्रमाणे लाल तिखट, चिमूटभर गरम मसाला घालावा. शेवटी चिकटपणा यावा म्हणून डाळीचे किंवा तांदळाचे पीठ घालावे.
सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर हातांना थोडेसे तेल लावून घ्यावे. आणि मिश्रणाचे लहान लहान गोळे घेऊन आपल्या आवडीनुसार आकार द्यावा. तयार कटलेट जाडसर रव्याने कोटिंग करावे. सर्व कटलेट बनवून घ्यावेत. त्यानंतर गरम तव्यावरती तेल सोडावे. मंद आचेवर तवा गरम ठेवत त्यामध्ये कटलेट पसरून घ्या. मध्यम आचेवर पाच ते सहा मिनिटे कटलेट दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. त्याला सुंदर सोनेरी रंग येईल.
रव्याच्या कोटिंग मुळे कटलेट दिसायलाही सुंदर आणि खायलाही क्रिस्पी होतात. याशिवाय तव्यामध्ये कटलेट फ्राय करताना कमीत कमी तेलाचा वापर केल्याने आपला पदार्थ अधिक आरोग्यदायी होतो. अगदी कमी वेळामध्ये आणि स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण आरोग्यदायी बीटरूट कटलेट बनवू शकतो. हे कटलेट्स टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम खावू शकतो. नाश्ता साठी रोज काय बनवायचं असा प्रश्न असेल आणि टेस्टी आणि हेल्दी पर्याय म्हणून बीटरूट कटलेट्स नक्की बनवून पहा.