Gavhachi Kheer Recipe: श्रावणात बनवा पारंपरिक गव्हाची खीर, यापद्धतीने होणार नाही खराब, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
रव्याची खीर, बेसणाची खीर, प्रसादाचा शिरा तसेच विविध पारंपरिक खीर नेहमी बनवल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे गव्हाची खीर. फक्त दोन साहित्यात चविष्ट अशी पारंपरिक ही रेसिपी तयार होते.
अमरावती: श्रावण महिन्यात देवाच्या नैवेद्यासाठी विविध गोड पदार्थ महिला बनवतात. रव्याची खीर, बेसनाची खीर, प्रसादाचा शिरा तसेच विविध पारंपरिक खीर नेहमी बनवल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे गव्हाची खीर. फक्त दोन साहित्यात चविष्ट अशी पारंपरिक ही रेसिपी तयार होते. अगदी घरगुती सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यातून तयार होणारी खीर कशी बनवायची? त्याची रेसिपी जाणून घेऊ.
गव्हाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 वाटी गहू, 1 वाटी साखर, 2 छोटे चमचे तूप आणि ड्रायफ्रुट्स हे साहित्य लागेल.
गव्हाची खीर बनवण्याची कृती
सर्वात आधी गहू 12 तास भिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर गहू मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. बारीक करताना गव्हाची पेस्ट किंवा पीठ बनवायचे नाही. फक्त त्याचा कोंडा निघेल असे बारीक करायचे आहे. त्यानंतर पाणी टाकून गव्हातील कोंडा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर गव्हाच्या तीन पट पाणी टाकून गहू कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत. मध्यम आचेवर चार शिट्टीमध्ये गहू शिजतात.
advertisement
त्यानंतर खीर बनवून घेऊ शकता. त्यासाठी शिजवलेले गहू आणि साखर एका भांड्यात टाकून त्याला शिजवून घ्यायचं आहे. साखर विरघळली की, त्याला आणखी 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. साखर तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात टाकून घेऊ शकता. त्यानंतर खीर शिजतपर्यंत तूप गरम करून घेऊन त्यात ड्राय फ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत.
त्यानंतर तेच ड्राय फ्रूट्स खीरमध्ये टाकून घ्यायचे आहेत. चविष्ट आणि हेल्दी अशी पारंपरिक खीर तयार झालेली असेल. ड्रायफ्रूट्स यात ऑप्शनल आहेत. तुम्ही वेलची पूड, सुंठ, जायफळ सुद्धा यात टाकू शकता. ही खीर खाताना तुम्ही यात दूध टाकून खाऊ शकता. तसेच देवाला नैवेद्य सुद्धा दाखवू शकता. दूध हे खीर खाण्याच्या वेळी टाकायचे आहे. आधीच दूध टाकून घेतल्यास खीर लवकर खराब होण्याची शक्यता असते. तुम्ही नक्की बनवून बघा पारंपरिक अशी गव्हाची खीर.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
August 06, 2025 5:49 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Gavhachi Kheer Recipe: श्रावणात बनवा पारंपरिक गव्हाची खीर, यापद्धतीने होणार नाही खराब, Video