Dahi Bhat Recipe: श्रावणात उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? झटपट बनवा दही भात, रेसिपीचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
उपवासाला पण साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे किंवा भगर एवढेच खात असतो. पण जर तुम्हाला वेगळं काही खायचं असेल तर तुम्ही उपवासाचा दही भात करू शकता.
छत्रपती संभाजीनगर : श्रावण महिन्यामध्ये आपल्यापैकी अनेकांना उपवास असतो. पण उपवासाला पण साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे किंवा भगर एवढेच खात असतो. पण जर तुम्हाला वेगळं काही खायचं असेल तर तुम्ही उपवासाचा दही भात करू शकता. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. घरच्या साहित्यापासून ही रेसिपी कशी करायची? याबद्दलचं ऋतुजा पाटील यांनी माहिती दिली आहे.
दही भातासाठी लागणारे साहित्य
एक वाटी भगर (वरई), एक वाटी दही, साजूक तूप, जिरे, हिरवी मिरची, जिरेपूड, सेंदव मीठ, साखर, डाळिंबाचे दाणे आणि पाणी एवढेच साहित्य यासाठी लागणार आहे.
advertisement
दही भात करण्याची कृती
सर्वप्रथम एक वाटी भगर स्वच्छ धुऊन घ्यायची. आणि त्यानंतर कुकरमध्ये भगर टाकून त्यामध्ये दोन वाटी पाणी टाकायचं आणि त्याच्या दोन चांगल्या शिट्ट्या करून घ्यायच्या. म्हणजेच की तुमची भगर व्यवस्थित शिजली पाहिजे. भगर शिजवून घ्यायची त्यानंतर एका भांड्यामध्ये एक वाटी दही घ्यायचं त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही त्यात साखर टाकावी आणि जी भगर आपली शिजून झालेली आहे दह्यामध्ये टाकायची आणि एकजीव करून घ्यायची.
advertisement
त्यानंतर फोडणीसाठी एका पॅनमध्ये साजूक तूप टाकायचं त्यामध्ये जिरे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून फोडणी तयार करायची. ती फोडणी त्या मिश्रणामध्ये टाकायची सर्व एकजीव करून घ्यायचं. वरून गार्निशिंगसाठी थोडीशी जिरे पावडर टाकायची आणि तुपात तळलेले ड्रायफ्रूट तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि वरतून डाळिंबाचे दाणे टाकायचे सर्व एकजीव करून घ्यायचं. जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही त्यामध्ये ती कोथिंबीर देखील टाकू शकता. अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये हा दहीभात तयार होतो तर तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
August 06, 2025 3:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Dahi Bhat Recipe: श्रावणात उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? झटपट बनवा दही भात, रेसिपीचा Video

