बेसनाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य
2 छोटे चमचे बेसन पीठ, 1 ग्लास दूध, 1 वाटी साखर, 2 छोटे चमचे तूप, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स पावडर हे साहित्य लागेल.
बेसनाची खीर बनवण्याची कृती
advertisement
सर्वात आधी गॅसवर एक भांडे ठेवून त्यात तूप गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात बेसन पीठ टाकून ते भाजून घ्यायचं आहे. थोडं लालसर होईपर्यंत बेसन भाजा. झालं की, त्यात दूध टाकून घ्यायचं आहे. बेसन आणि दूध एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर त्याला उकळी काढून घ्यायची आहे.
उकळी आल्यानंतर त्यात साखर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा उकळी काढून घ्यायची आहे. नंतर त्यात वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा एक हलकी उकळी काढून घ्यायची आहे. टेस्टी अशी बेसनाची खीर तयार झालेली असेल. पुरी सोबत याचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पाला दाखवू शकता. या खीरमध्ये ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे. तसेच बेसन पीठ देखील तुम्ही अंदाजानुसार घेऊ शकता. 2 चमचे बेसन पीठ आणि 1 ग्लास दूध वापरल्यास 3 वाटी खीर तयार होते. तुम्ही नक्की बनवून बघा, गणपती बाप्पासाठी पारंपरिक नैवेद्य बेसनाची खीर.





