मसालेदार चव, थोडीशी झणझणीतता आणि पोटाला भरपूर समाधान देणारी ही पोळी सकाळच्या न्याहारीसाठी, डब्यासाठी किंवा हलकंफुलकं संध्याकाळचं जेवण म्हणूनही छान पर्याय ठरते.
Health Tips: आरोग्यदायी जीवनशैलीसाठी कोणते तेल फायदेशीर? कशात असतात जास्त पोषक घटक?
बेसनाची पोळी साहित्य: ( 2 ते 3 जणांसाठी)
बेसन – 2 कप
लसूण पेस्ट – 1 टिस्पून
advertisement
आलं-हिरव्या मिरचीची पेस्ट – 1 टिस्पून
हळद – ½ टिस्पून
लाल तिखट – 1 टिस्पून
जिरे – ½ टिस्पून
हिंग – 1 चिमूट
मीठ – चवीनुसार
तेल – 2 टेबलस्पून (पीठात व भाजताना)
बारीक चिरलेली कोथिंबीर – 2 टेबलस्पून
पाणी – मिश्रण तयार करण्यासाठी
बेसनाची पोळी कृती
1. एका मोठ्या वाटीत बेसन घेऊन त्यात हळद, तिखट, मीठ, जिरे, हिंग, लसूण पेस्ट, आलं-मिरची पेस्ट आणि कोथिंबीर घालावी.
2. थोडं थोडं पाणी घालत मिश्रण जास्त घट्ट पण नाही आणि पातळही नाही असं करावं.
3. तवा गरम करायला ठेवावा. तो गरम झाला की त्यावर तेल सोडून मिश्रण टाकून घ्यावे आणि पळीने गोलाकार करावे.
5. 1 मिनिट त्यावर झाकण ठेवून मग व्यवस्थित भाजून घ्यावे.
6. दोन्ही बाजूने लालसर भाजून घेतल्यावर बेसनाची पोळी तयार होईल.
खाण्याची योग्य साथ:
दही, टोमॅटो सॉस, तिखट लोणचं किंवा एखादी साधी आमटी यासोबत बेसनाची पोळी उत्तम लागते. ही पोळी डब्यासाठीही योग्य आहे, दिवसभर चव टिकून राहते आणि खराब होत नाही.
पारंपरिक चवीला आधुनिक जीवनशैलीत सामावून घेणारी ही बेसनाची पोळी केवळ स्वादापुरती मर्यादित नाही तर ती आरोग्यदायीही आहे. झटपट होणारी, सोपी आणि सर्वांना आवडणारी ही रेसिपी प्रत्येक मराठी स्वयंपाकघरात हमखास असावी अशीच आहे, त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा.