जालना : ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात चिगूर म्हणजे भोकरीच्या झाडाचा बहर दिसून येतो. ही एक प्रकारची रानभाजी आहे. ती वर्षातून एकदाच मिळते. त्यामुळे अनेकजण ही भाजी आवडीने 150 रुपये किलोने खरेदी करून आस्वाद घेतात. दरवर्षी मार्च महिन्यात चिगूर म्हणजे भोकरचा फुलोरा येण्यास सुरुवात होते. ही रानशभाजी कॉर्डिया डायकोटोमा या शास्त्रीय नावाने ओळखली जाते. या फुलोऱ्याची भाजी छान बनते. त्यामुळे अनेकजण हा फुलोरा झाडावर जाऊन तोडून त्याची भाजी तयार करून खाण्यावर भर देतात. पाहुयात भोकराच्या फुलोऱ्याची रेसिपी कशी बनते.
advertisement
सध्या भोकरीची झाडे दुर्मिळ होत चालली आहेत. जी झाडे आहेत ती मिस्तरी किंवा गवंडी घरावर स्लॅप टाकण्यासाठी आवश्यक असलेले प्लायवूड म्हणून या झाडाचा वापर करतात. त्यामुळे झाडांची संख्या कमी होत असून, चिघूर दीडशे रुपये किलो मिळत आहे. हे भोकरीचे झाड शीतल सावली देणारे आणि पक्ष्यांचे निवासस्थान असते. यावर सतत खारीचा वावर असतो. चिगूर तोडून खाल्ल्यास आतड्यांची ताकद वाढते. भोकरीच्या झाडावर आलेला चिगूर तोडून बाजारात विक्रीसाठी आणणे हे मोठे अवघड काम आहे. तरीही अनेकजण पोटाची खळगी भरण्यासाठी चिगूर तोडून बाजारात विक्रीसाठी घेऊन जातात.
ॲसिडिटीचा त्रास होईल दूर, दररोज ताक पिण्याचे शरीराला फायदेच फायदे, पण प्यावं किती?
भोकराच्या फुलोऱ्याची रेसिपी बनवण्याची पद्धत
भोकरीच्या झाडाला आलेला फुलोरा तोडून घ्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. तव्यावर तेल, हळद, मीठ, कांदा, मिरची पावडर टाकून थोडेसे पाणी टाकून शिजल्यास चविष्ट भाजी होते.
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला भोकरीच्या झाडाला फुलोरा येतो. या फुलोऱ्याची रानभासी अत्यंत चविष्ट अशी होते. पूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर लोक ही भाजी आवडीने खायची. आता अनेकांना या रान भाजीबाबत माहिती नाही. परंतु आम्ही जुनी जाणती माणसं आजही हा फुलोरा तोडून आणून त्याची अत्यंत चविष्ट अशी भाजी बनवून खातो, असं स्थानिक विठ्ठल बापूराव काळे यांनी सांगितले.