ब्रेड पॅटीससाठी लागणाऱ्या साहित्याची यादी
ब्रेडच्या स्लाईसेस – 8 ते 10
बटाटे – 5 मध्यम, उकडलेले आणि मॅश केलेले
हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं – ठेचून
जिरे – 1 टीस्पून
मोहरी – 1 टीस्पून
हळद – 1 टीस्पून
advertisement
लाल तिखट – 1 टीस्पून
एक कांदा – बारीक चिरलेला
मीठ – चवीनुसार
कोथिंबीर – बारीक चिरलेली
तेल – तळण्यासाठी
Health Tips: पावसाळ्यात गरमागरम भजी खाताय? आधी हे पाहा, ती चूक कधीच करणार नाही!
कृती:
1. सारण तयार करा: कढईत एक चमचा तेल, त्यात जिरे, मोहरी, एक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या-आलं-लसूण पेस्ट टाकून लालसर परतून घ्या. त्यानंतर उकडलेले बटाटे मॅश करून त्यात घाला. वरून हळद, मीठ टाका आणि व्यवस्थित परतून घ्या. मग आपले सारण तयार होईल.
2. ब्रेडची तयारी: 2 ब्रेड स्लाईसेसना हलक्या हाताने हिरव्या मिरची, लसूण, आलं ह्याची पेस्ट लाऊन घ्या. त्यावर तयार केलेले सारण व्यवस्थित दोन्ही बाजूला लाऊन घ्या. एकावर एक ठेवून ते त्रिकोणी कापून घ्या. पॅटिस कोटिंगसाठी बेसन घ्या. त्यात हळद, मीठ, लाल तिखट, पाणी टाकून थोडेसे मीडियम पेस्ट करून घ्या आणि मग ते ब्रेड पॅटीस त्यात टाकून व्यवस्थित कोटिंग करून घ्या.
3. तळणी: कढईत तेल गरम करून हे तयार पॅटीस मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत तळा.
5. सर्व्हिंग: गरमागरम ब्रेड पॅटीस हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर चहा किंवा कॉफीच्या जोडीने सर्व्ह करा.
टीप: अधिक हेल्दी पर्यायासाठी पॅटीस एअर फ्रायरमध्ये किंवा तव्यावर थोड्या तेलात शेकूनही तयार करता येतील.