अंडा भुर्जी साहित्य
4 अंडी
1 मोठा कांदा (बारीक चिरलेला)
1 मोठा टोमॅटो (बारीक चिरलेला)
1 चमचा आले-लसूण पेस्ट
(1/2) चमचा हळद
(1/2) चमचा लाल तिखट
(1/2) चमचा गरम मसाला
(1) ते (2) चमचे तेल
चवीनुसार मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर (सजावटीसाठी)
Winter Health News : हिवाळ्यात कमी पाणी पिताय? वेळीच व्हा सावध, नाहीतर हे आजार नाही सोडणार साथ
advertisement
अंडा भुर्जी कृती
एका कढईत तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. आले-लसूण, कोथिंबीर पेस्ट घालून एक मिनिट परता. बारीक चिरलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. त्यात हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून मिक्स करा. चवीनुसार मीठ घाला. एका भांड्यात अंडी फेटून घ्या. शिजलेल्या मिश्रणात फेटलेली अंडी घाला आणि हळूवारपणे ढवळत राहा. अंडी सेट झाल्यावर आणि भुर्जीचा पोत मऊ झाल्यावर गॅस बंद करा. वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा. तुम्ही ही भुर्जी पाव, चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता.





