गार्लिक ब्रेड साहित्य (2 व्यक्तींसाठी)
ब्रेड स्लाइस – 4
बटर – 2 मोठे चमचे
लसूण (बारीक चिरलेला किंवा किसलेला) – 10-12 पाकळ्या
कोथिंबीर – थोडीशी (बारीक चिरलेली)
बारीक चिरलेली एक मिरची
मीठ – चवीनुसार
चीज - किसलेले
चिली फ्लेक्स: चवीनुसार
Chicken Recipe: नुसतं नाव काढलं तर तोंडाला पाणी सुटेल, आगरी स्टाईल चिकन लपेटा, अशी बनवा रेसिपी
advertisement
गार्लिक ब्रेड कृती
1. एका छोट्या वाडग्यात बटर, लसूण, कोथिंबीर, चिली फ्लेक्स आणि चिमूटभर मीठ एकत्र करून छान मिक्स करा.
2. हे मिश्रण ब्रेडच्या स्लाइसवर समान पसरवा.
3. ओव्हनमध्ये 180° C वर 5-7 मिनिटं बेक करा (किंवा तव्यावर 2 मिनिट खरपूस होईपर्यंत भाजा).
4. वरून किसलेलं चीज टाकून अजून एक मिनिट तव्यावर ठेवा आणि बघा तुमचा डॉमिनोज-स्टाईल गार्लिक ब्रेड तयार!
सोनसळी रंग, वितळलेलं बटर, आणि लसूणाचा झणझणीत सुगंध पहिला घास घेताच तुम्हाला वाटेल की रेस्टॉरंटचं खाणं घरात आलंय.
टिप: टोमॅटो केचप, मॅयो किंवा चीज डिपसोबत सर्व्ह करा.





