गार्लिक चिकन साहित्य
चिकन: बोनलेस चिकनचे तुकडे (साधारण १/२ किलो)
मॅरीनेशनसाठी: आले-लसूण पेस्ट, मीठ, हळद, लाल तिखट, काळी मिरी पावडर, तेल
तळण्यासाठी/परतण्यासाठी: बटर किंवा तेल, भरपूर लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या)
चवीसाठी: पनीर चिली मसाला १ पॅकेट (अर्धा किलो चिकनसाठी एक पॅकेट), गरम मसाला (पर्यायी), लाल मिरची फ्लेक्स (पर्यायी), ताजी कोथिंबीर/ओरेगॅनो (सजावटीसाठी)
advertisement
Kanji Vada : फेमस कांजी वडा, फक्त 30 रुपयात चाखा चवं, अमरावतीमध्ये हे आहे प्रसिद्ध ठिकाण, Video
गार्लिक चिकन कृती :
चिकन मॅरीनेट करा: चिकनचे तुकडे मीठ लावून स्वच्छ धुवा.
आले-लसूण पेस्ट, हळद, तिखट, थोडे तेल घालून चिकन ३-४ तास मॅरीनेट करा.
चिकन तळा: एका कढईत तेल किंवा बटर गरम करा. त्यात बारीक चिरलेला भरपूर लसूण परतून घ्या. नंतर मॅरीनेट केलेले चिकनचे तुकडे टाकून सोनेरी होईपर्यंत तळा.
सॉस/ग्रेव्ही बनवा: चिकन तळल्यावर, त्यात आवश्यकतेनुसार थोडे पाणी किंवा चिकन स्टॉक, चिकन मसाला, गरम मसाला घालून ग्रेव्ही घट्ट होऊ द्या. चवीनुसार मीठ तपासा.
सर्व्ह करा: गार्लिक चिकन तयार आहे. वरून ताजी कोथिंबीर किंवा ओरेगॅनो घालून गरम गरम सर्व्ह करा. हे स्टार्टर म्हणून किंवा भाकरी/रोटीसोबत छान लागते.





