गव्हाच्या पिठाचे आयते बनवण्यासाठी लागणारे साहित्य
गव्हाचे पीठ, बेसन पीठ तुमच्या अंदाजानुसार घ्यायचे आहे, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, पालक, जिरे, लाल तिखट, हळद, धणे पावडर, मीठ आणि ताक हे साहित्य लागेल.
advertisement
गव्हाच्या पिठाचे आयते बनवण्याची कृती
सर्वात आधी आयते बनवण्यासाठी पीठ तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये बेसन पीठ मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर त्यात पालक टाकून घ्या. कोथिंबीर टाकून घ्या. कढीपत्ता सुद्धा टाकून घ्या. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचे आहे. सर्व भाजी टाकून झाल्यानंतर मसाले टाकायचे आहेत. त्यात सर्वात आधी जिरे टाकून घ्या आणि त्यानंतर हळद, लाल तिखट, धणे पावडर आणि मीठ टाकून घ्यायचे आहे.
त्यानंतर ते सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे आहे. पीठ मिक्स करून झाल्यानंतर ताक टाकून ते पीठ भिजवून घ्यायचे आहे. सर्व पीठ हे ताकानेच भिजवून घ्यायचे आहे. पीठ भिजवल्यानंतर तुम्ही लगेच आयते बनवून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला डोसा तवा वापरायचा आहे. त्यावर आयते लवकर तयार होतात. साध्या तव्यावर सुद्धा तुम्ही हे आयते बनवू शकता. त्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे. त्याचबरोबर तेल सुद्धा लावून घ्यायचे.
आयते बनवण्यासाठी तवा थोडा गरम होऊ द्या. त्यानंतर त्यावर तेल लावून घ्या. तेल लावल्यानंतर त्यावर बॅटर टाकून घ्यायचे. बॅटर व्यवस्थित तव्यावर पसरवून घ्यायचे आहे. एका बाजूने आयते शिजवून घ्यायचे आहे. एका बाजूने शिजल्यानंतर परतवून घ्या. परतवून घेण्याच्या आधी त्यावर थोडे तेल टाकून घ्यायचे आहे.
त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर गव्हाच्या पिठाचे चमचमीत आयते तयार होतील. टोमॅटो सॉस किंवा एखाद्या चटणीसोबत तुम्ही हे आयते खाऊ शकता.