डोंबिवली : घावण हा पदार्थ कोकणात सगळ्यांच्या घरी आवर्जून बनवला जातो. लहान मुलांना सुद्धा घावण खूप आवडतो. यावर तुम्ही भाज्या घालून सुद्धा घावण बनवू शकता. जेणेकरून जी लहान मुलं भाज्या खात नाहीत त्यांच्या शरीरात या भाज्यांमध्ये असणारे जीवनसत्व जाण्यास मदत होते. भाजीने भरलेले हे घावण कसे बनवायचे? याची रेसिपी आपल्या गृहिणी शितल पाटील यांनी सांगितली आहे.
advertisement
घावण बनवण्यासाठी लागणारे साहित्य
एक वाटी तांदळाचे पीठ, एक वाटी शिमला मिरची, एक वाटी टोमॅटो, एक वाटी कांदा, एक वाटी गाजर, चवीपुरतं मीठ आणि एक ग्लास पाणी हे साहित्य लागेल.
चिकन, मटणाला तोडीस तोड! शाकाहाऱ्यांसाठी 'हा' पदार्थ म्हणजे जणू वरदान, चवही भारी
घावण बनवण्यासाठी कृती
सर्वप्रथम एक वाटी तांदळाचे पीठ भांड्यात घ्यावे. त्यामध्ये कांदा, गाजर, टोमॅटो, शिमला मिरची या भाज्या बारीक चिरून घालाव्यात. यासोबतच तुम्हाला आवडतील त्या भाज्याही यात तुम्ही घालू शकता. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकावे आणि हळू हळू पाणी मिसळून आपलं घावण्याचं पीठ तयार करून घ्यायचं. यात काळजीपूर्वक पाणी घाला कारण अगदीच पातळ पीठ झालं तर घावण खराब होण्याची शक्यता असते.
घावण्याच पीठ तयार झाल्यावर गॅस सुरू करून त्यावर तवा ठेवावा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर चमचाभर तेल ओतून घावण्याचं पीठ घालावं. घावण गोल घातल्यावर त्यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून घ्यावं. घावण्याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित परतून घेतल्यावर लालसर झाल्यावर घावण तयार होते. हे तयार झालेले भाजीचे घावणे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर खाऊ शकता आणि तुमच्या लहानग्यांना नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी स्नॅक्ससाठी देऊ शकता.