गुळपोळी साहित्य
कणीक (पोळीकरिता):
गव्हाचे पीठ – 2 कप
मीठ – चिमूटभर
तेल/तूप – 1 टेबलस्पून
पाणी – आवश्यकतेनुसार (मऊ कणीक भिजवण्यासाठी)
सारण (गुळाचे):
गूळ (चिरलेला/किसलेला) – १½ कप
तीळ – ½ कप
वेलदोड्याची पूड – ½ टीस्पून
तूप – १ टेबलस्पून
गुळपोळी कृती
कणीक भिजवणे : गव्हाच्या पिठात मीठ, तेल घालून पाणी टाकत मऊ कणीक भिजवा. ओलसर कापडाखाली 20–30 मिनिटे झाकून ठेवा.
advertisement
संक्रांतीच्या आधी भोगी का साजरी करतात? भोगीच्या भाजीची परंपरा काय? Video
सारण तयार करणे : कढईत तीळ मंद आचेवर हलके भाजून घ्या. भाजून घेतल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात गूळ घालून, वेलची पूड घालून मिश्रण वाटून घ्या.
पोळी बनवणे : कणकेचे गोळे करून त्यात गुळाचे सारण भरा. अलगद पोळी लाटा (जाडसर ठेवा). तव्यावर मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी तूप लावून छान भाजून घ्या.
सर्व्ह करा : गरमागरम गुळपोळी तूप किंवा दूध/लोणी सोबत द्या.
टीप: हिवाळ्यात ही गुळपोळी शरीराला उष्णता देते आणि संक्रांतीसाठी खास लागते.





