कैरीची कढी बनवण्याची लागणारे साहित्य
शिजवलेल्या कैरीचा गर, तेल, जिरे, मोहरी, कडीपत्ता, कोथिंबीर, बारीक केलेले शेंगदाणे, साखर, हळद, मीठ, बेसन पीठ, लसूण, लाल मिरची हे साहित्य लागेल.
चिया आणि सब्जा सीड्समध्ये फरक काय? खाण्याचे शरीराला फायदे कोणते? आहार तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
कैरीची कढी बनवण्याची कृती
सर्वात आधी कैरीच्या गरात बेसन पीठ टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर ते फिरवून त्याचे व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचे आहे. त्यानंतर भांडे गॅसवर ठेवून त्यात तेल टाकून घ्यायचे आहे. तेल थोडे गरम झाले की, त्यात जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची. त्यानंतर लाल मिरची टाकून घ्यायचे. त्यानंतर कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यात लसूण टाकून घ्यायचा. लसूण थोडा मिक्स केल्यानंतर त्यात शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे आहे. ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर हळद टाकून घ्यायची आणि लगेच कैरीचा गर टाकून घ्यायचा आहे.
advertisement
त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यात लागत असल्यास पाणी सुद्धा टाकून घेऊ शकता. त्याचबरोबर चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे. ते मिक्स केल्यानंतर त्यात चवीपुरती साखर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर जवळपास कढी तयार होत आली असेल. आता कढीला उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर कढी जेवणासोबत पिण्यासाठी तयार असेल. झटपट तयार होणारी आंबट गोड अशी कढी तुम्ही नक्की बनवून बघा. यामध्ये तुम्ही साखरऐवजी गूळ सुद्धा वापरू शकता. त्याची चव आणखी छान लागते. त्याचबरोबर कैरी शिजवून घेण्याऐवजी भाजून सुद्धा घेऊ शकता.