आमरस बनवण्यासाठी लागणारे साहित्य
शिजवून घेतलेली कैरी, गव्हाचे पीठ, साखर, तूप, खोबरा किस, विलायची पावडर आणि बारीक केलेले जिर हे साहित्य लागेल.
आमरस बनवण्याची कृती
सर्वात आधी शिजवलेल्या कैरीतील गर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात थोडे पाणी टाकून त्याला रवीच्या साहाय्याने फिरवून घ्यायचा. आमरस करायला घेताना सर्वात आधी गॅसवर भांडे ठेवून त्यात तूप टाकून ते गरम होऊ द्यायचं. तूप गरम झालं की त्यात जिर टाकून घ्यायचं आहे. जिर तळतळल्यानंतर त्यात एक छोटा चमचा गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे आहे. ते गव्हाचे पीठ लालसर होतपर्यंत भाजून घ्यायचे आहे. गव्हाचे पीठ लाल झाल्यानंतर त्यात आता कैरीचा गर टाकून टाकायचा. तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा.
advertisement
मिक्स केल्यानंतर त्यात पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तसे अंदाजानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर साखर टाकून घ्यायची. साखर टाकल्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आमरसला छान उकळी आल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि खोबरा किस टाकून घ्यायचा आहे. ते सुद्धा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आमरस तयार होईल. हा आमरस तुम्ही रताळ्याची पुरी आणि सरगुंडे यासोबत खाऊ शकता. अतिशय टेस्टी लागते.