मुंबई : सध्या सर्वत्र थंडी सुरू झाली आहे. थंडीच्या दिवसात चविष्ट आणि पौष्टिक असं काही घरच्या घरी बनवायचे असेल तर करडईची भाजी रेसिपी नक्की ट्राय करा. फक्त थंडीच्या दिवसात उपलब्ध असणारी ही भाजी फार चविष्ट होते. करडईच्या भाजीची रेसिपी कशी करायची? याबद्दलच आपल्याला मुंबईतील गृहिणी रानु रोहोकले यांनी माहिती दिली आहे.
advertisement
कशी बनवाल रेसिपी?
भाजी करताना सर्वप्रथम भाजी व्यवस्थित कापून घ्यावी. जास्त लहान कापू नये, मध्यम आकारात भाजी कापून घ्यावी. भाजी कापल्या नंतर स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर एका टोपात पाणी घ्यावे, मध्यम आचेवर पाणी थोड कोमट झाल्यावर भाजी पाण्यात टाकावी. नंतर भाजी पाण्यात उकडवून घ्यावी मात्र भाजी जास्त उकडली जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्यावी. तुम्ही साधारण 21 ते 25 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती ही भाजी छान अशी शिजवून घेऊ शकता.
किंमत फक्त 160! भोईराज हॉटेलची खास मच्छी थाळी खवय्यांची पहिली पसंत
आता भाजी शिजवून झाली की त्यामधील सगळं पाणी काढून घ्यायचं. ही भाजी थंड झाली की मग आपल्याला पिळून घ्यायची आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे. एकदम खरडून पिळून काढायची याचे कारण भाजी एकदम ओली होते आणि खायला सुद्धा चविष्ट लागत नाही.
आता ही भाजी पिळून घेतली की भाजी थोडी थंड होऊन द्यायची आणि मग पुन्हा एकदा पिळून घ्यायची. आता पिळून झालेल्या भाजीला फोडणी द्यायची. या भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे. या फोडणीत लाल सुक्या मिरच्या, लसूण आणि मीठ याचे वाटण टाकले की फोडणी आणि भाजी दोन्ही चविष्ट होतात. त्यानंतर हे वाटण तेलात घालून घ्यायचं आणि एक ते दोन मिनिटांसाठी फ्राय करून घ्यायचं आहे.
त्यानंतर ही पिळून घेतलेली भाजी या वाटणमध्ये घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. या वाटणसोबत पाच ते सात मिनिटांसाठी कमी आचेवर भाजी परतून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली भाजी तयार होईल.





