कडवटपणा दूर करून कुरकुरीत कारल्याची काप
साहित्य (2–3 जणांसाठी )
कारलं – 4 ते 5 मध्यम आकाराची.
मीठ – 1 मोठा चमचा.
लिंबाचा रस – 1 टेबलस्पून.
हळद – ¼ चमचा.
लाल तिखट – 1 चमचा (चवीनुसार).
धने–जिरे पावडर – ½ चमचा.
चिमूटभर हिंग.
तेल – तळण्यासाठी.
Recipe: हवामान बदललं, नाश्ताही बदला! पौष्टिक आणि चविष्ट रताळ्याचे धपाटे, अगदी सोपी रेसिपी, Video
advertisement
कडवटपणा कमी करण्याची पद्धत…
कारलं धुवून, बारीक चकत्या करा.
फार जाड नको, पण फार पातळही नाही, मध्यम काप चांगले लागतात.
त्या कापांवर मीठ आणि थोडा लिंबाचा रस टाका.
व्यवस्थित मिक्स करून 15–20 मिनिटं झाकून ठेवा.
नंतर हाताने थोडं पिळून त्यातला रस (ज्यात कडवटपणा असतो) काढून टाका. ही ट्रिक कडवटपणा 70–80% कमी करते
कुरकुरीत बनवण्याची पद्धत:
पिळून घेतलेल्या कारल्याच्या कापांमध्ये हळद, तिखट, धने–जिरे पावडर, हिंग चवीनुसार मीठ घाला.
फार ओलसर न ठेवता कोरडं मिश्रण बनवा, थोडंसं पाणी लागलं तरच शिंपडा.
(कापांना हलकं कोटिंग बसलं पाहिजे.)
तेल गरम करा (मध्यम आचेवर).
कारल्याचे काप एकेक करून तेलात टाका आणि सोनसळी कुरकुरीत होईपर्यंत तळा.
जास्त तेल शोषून घेऊ नये म्हणून पेपर टॉवेलवर काढा.
सर्व्ह करण्यासाठी:
गरमागरम कारल्याचे काप, भात आमटी, पोळी भाजी, किंवा चहा वेळेचा स्नॅक म्हणून अप्रतिम लागतात. वरून थोडं चाट मसाला शिंपडलं तर अजून धमाल.





