Recipe: हवामान बदललं, नाश्ताही बदला! पौष्टिक आणि चविष्ट रताळ्याचे धपाटे, अगदी सोपी रेसिपी, Video
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Recipe: बदलत्या हवामानात आरोग्यासाठी लाभदायी रताळ्याचे धपाटे रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी सोपी आणि आरोग्यदायी आहे.
मुंबई: सध्या महाराष्ट्रभर हवामानाचं स्वरूप बदलत आहे. कधी उन्हं, कधी पाऊस, त्यामुळे लोकांना सर्दी, खोकला किंवा अपचन यासारख्या त्रासांचा सामना करावा लागतो. अशा दिवसांमध्ये सकाळी जड नाश्ता केला तर शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हलका, पौष्टिक आणि झटपट तयार होणारा नाश्ता निवडणं महत्त्वाचं ठरतं. हे लक्षात घेऊन शेफ विशाल यांनी एक सोपी आणि आरोग्यदायी ‘रताळ्याचे धपाटे’ रेसिपी सांगितली आहे.
रताळ्याचे धपाटे बनवण्यासाठी साहित्य
या रेसिपीसाठी लागणारं साहित्य अगदी घराघरात मिळणारं आहे. यामध्ये उकडलेली रताळी, गव्हाचं मळलेलं पीठ, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, हिरव्या मिरच्या (इच्छेनुसार), चवीनुसार मीठ आणि तिखट, थोडीशी कोथिंबीर, तसेच ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स चवीसाठी वापरले जातात. भाजण्यासाठी तुम्ही तेल किंवा बटरपैकी कोणतंही वापरू शकता.
advertisement
रताळे धपाट्यांची कृती
कृतीदेखील तितकीच सोपी आहे. सर्वप्रथम उकडलेली रताळी बारीक मॅश करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये तिखट, मीठ, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून सर्व साहित्य छान मिक्स करा. गव्हाचं पीठ आधीच मळून ठेवा. आता त्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करा आणि प्रत्येक गोळ्याला थोडं दाबून त्यात रताळ्याचं मिश्रण भरा. हे गोळे हलक्या हाताने थापून धपाटे तयार करा.
advertisement
तवा मंद आचेवर गरम करून त्यावर धपाटे भाजा. हवे असल्यास थोडं तेल किंवा बटर लावू शकता. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजल्यावर हे रताळ्याचे धपाटे तयार होतात. गरमागरम धपाटे सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह केल्यास सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी हा एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पर्याय ठरतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 28, 2025 2:26 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Recipe: हवामान बदललं, नाश्ताही बदला! पौष्टिक आणि चविष्ट रताळ्याचे धपाटे, अगदी सोपी रेसिपी, Video








