मुंबई : आतापर्यंत आपण अनेक कचोऱ्यांचे प्रकार पाहिलेले आहेत. त्यामध्ये कुरमुऱ्याची कचोरीची चव अप्रतिम असल्याने बहुतेक लोकांना ती खायला आवडते. संध्याकाळच्या नाश्त्यात काही खास आणि झटपट बनवायचे असेल तर कुरमुऱ्यापासून इंस्टंट कचोरी ट्राय करा. ही कचोरी पटकन तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते. मुंबईतील स्मिता कापडणे यांनी घरीच कुरमुऱ्यांची कचोरी कशी बनवायची याबद्दल माहिती सांगितली आहे.
advertisement
खुसखुशीत गोड आणि तिखट अशा दोन्ही स्वादांमध्ये असणारी कचोरी ही आपल्या सगळ्यांनाच आवडते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ म्हणून कचोरी आहे. काही पदार्थही असे असतात जे आपल्याला खायला खूपच आवडतात आणि त्यांपैकीच एक पदार्थ म्हणजे कचोरी. हा भारतीयांचा आवडतं टी टेन्स स्नॅक्स आहे. सणासुदीच्या काळात संध्याकाळी हमखास चहा सोबत हा कचोरीचा आस्वाद घेतला जातो.
ऐन सणासुदीचा काळ, साखर अन् चणा डाळचे भाव वाढले; छत्रपती संभाजीनगरमधील व्यापारी काय म्हणाले?, VIDEO
कुरमुऱ्याची कचोरी बनवण्यासाठी साहित्य
एक वाटी कुरमुरे, एक वाटी डाळ, एक वाटी शेंगदाणे, लसुण, जिरे, धने, ओवा, मीठ साखर एक चमचा, लिंबु पावडर एक चमचा, आमचुर पावडर एक चमचा, एक वाटी मैदा आणि तेल हे साहित्य लागेल.
चिकन-मटणाची नुसती चव नाही, ताकदपण मिळते तेवढीच; एकदा भाजी खाऊन बघाच!
कुरमुऱ्याची कचोरी बनवण्यासाठी कृती
प्रथम कुरमुरे मिक्सरमधून दळून घ्या. नंतर डाळ्या आणि शेंगदाणे ते लालसर होईपर्यंत भाजून घ्या. नंतर ते सर्व एकञ करुन मिक्सरमधून पुन्हा दळून घ्या. त्यामध्ये लसुण, जिरे, धने, ओवा, चवीनुसार मीठ, साखर आणि लिंबु पावडर घालून एकजिव करून घ्या. त्या सारणात थोडे तेल आणि पाणी घाला. कचोरीच्या आवरणासाठी मैदा भिजवुन त्याच्या छान गोल पाळ्या वाटुन त्यामध्ये ते सारण भरुन मस्त गोळा वाळुन त्याला गरम तेलात तळुन घ्या. अशा प्रकारे कचोरी तयार झाली आहे.