चिकन-मटणाची नुसती चव नाही, ताकदपण मिळते तेवढीच; एकदा भाजी खाऊन बघाच!

Last Updated:

डॉ. स्मिता श्रीवास्तव सांगतात, औषधी गुणांनी परिपूर्ण अशी ही भाजी कारलं आणि हिरव्या लिचीसारखी दिसते. अनेक आजारांशी लढण्याची ताकद या भाजीतून शरिराला मिळते.

पूर्णपणे नैसर्गिक असल्यानं आरोग्यासाठी फायदेशीर.
पूर्णपणे नैसर्गिक असल्यानं आरोग्यासाठी फायदेशीर.
सौरभ वर्मा, प्रतिनिधी
रायबरेली : श्रावणाचे दिवस आहेत, अर्थात सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे. अनेकजण या महिन्यात मांसाहार करत नाहीत. शरिराला ताकद मिळावी यासाठी मांसाहारी पदार्थ उपयुक्त असतातच, मात्र मांसाहाराएवढी ताकद देणारे शाकाहारी पदार्थही अनेक आहेत. त्यामुळे श्रावणात एक भाजी आवर्जून खाण्याचा सल्ला दिला जातो, जी केवळ चवीला मटणासारखी लागत नाही, तर त्यातून पोषक तत्त्वही चिकन, मटणाएवढेच मिळतात.
advertisement
ही भाजी आहे करटोली, जिला कंटोळी किंवा कर्टुलंसुद्धा म्हणतात. तिचं इंग्रजी नाव आहे स्पायनी गार्ड (Spiny Gourd). या भाजीतून भरपूर पोषक तत्त्व शरिराला मिळतात. विशेष म्हणजे पावसाळ्यात ती आपोआप जमिनीतून उगवते, त्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक असल्यानं ती आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. बाजारात काहीच दिवस मिळणाऱ्या या भाजीला मोठी मागणी असते, म्हणूनच ती साधारण 150 ते 180 रुपये किलो दरानं विकली जाते.
advertisement
डॉ. स्मिता श्रीवास्तव सांगतात, औषधी गुणांनी परिपूर्ण अशी ही भाजी कारलं आणि हिरव्या लिचीसारखी दिसते. अनेक आजारांशी लढण्याची ताकद या भाजीतून शरिराला मिळते. या भाजीत फायटोन्यूट्रिएंट्स, आयर्न, प्रोटीन, व्हिटॅमिन असे अनेक पोषक तत्त्व भरभरून असतात.
advertisement
डॉक्टरांनी पुढे सांगितलं की, करटोली वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. कारण यात फायबर भरपूर असतं, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं. शिवाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीसुद्धा ही भाजी उपयुक्त ठरते. ज्यांना डायबिटीजचा त्रास असतो, त्यांना ही भाजी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण फायबरमुळे रक्तातली साखर कमी होण्यास मदत मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे करटोली भाजीमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते. शिवाय पचनशक्तीही उत्तम राहते.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
चिकन-मटणाची नुसती चव नाही, ताकदपण मिळते तेवढीच; एकदा भाजी खाऊन बघाच!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement