पूर्वतयारी (वड्यासाठी पीठ बनवणे)
साहित्य : जाडा तांदूळ - 1 किलो, चणा डाळ - 100 ग्रॅम, उडीद डाळ - 50 ग्रॅम, धणे - 1 चमचा, बडीशेप - 1 चमचा, मेथीचे दाणे - अर्धा चमचा
कृती : तांदूळ स्वच्छ धुवा. निथळून सुती कापडावर वाळवा. तांदूळ धुतल्यानं वडे मऊ होतात. पावसामुळे किंवा घाई असेल तर तांदूळ धुतले नाहीतर तरी चालेल. डाळ आणि इतर पदार्थ धुण्याची गरज नाही. हे सर्व पदार्थ एकत्र करुन गिरणीतून भरड दळून घ्यावं. पीठ हवाबंद डब्यात ठेवावे. हे वडे करायचे असतील तेव्हाच पीठ दळून घ्यावे. ताज्या पिठाचे वडे चांगले लागतात, असा सल्ला जाधव यांनी दिलाय.
advertisement
कोकणी पदार्थात हमखास लागणारा वाटण मसाला कसा तयार करतात? पाहा रेसिपी
सर्व पीठ तसंच धने पूड हे साहित्य बाजारात उपलब्ध असतात. ते सर्व एकत्र करून वापरता येतील. 2 कप तांदळाचे पीठ, अर्धा कप बेसन आणि 6 उडदाचे पापड भिजवून कुस्करून पीठ भिजवता येईल. उडदाची डाळ, मेथी दाणे, बडीशेप हे किमान 2 तास भिजवावेत, अशी माहिती त्यांनी दिली.
कोंबडी वड्याचे साहित्य : वड्याचं पीठ, 1 मोठा कांदा, 2 - 3 हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर, आलं, 5-6 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ
कोंबडी वड्याची कृती : कांदा, मिरची, आल, लसूण, मिरची हे सगळ वाटून घ्या. (काही जण आलं किंवा मिरची वापरत नाहीत पण कांदा जरूर घालावा.) एका परातीत पीठ, हळद, मीठ आणि गरम पाणी टाकून चपातीच्या कणकेप्रमाणे घट्ट मळून घ्या. रात्रभर उबदार जागेत झाकून ठेवा.सकाळी पीठ फुगून येईल.
बेस्ट स्ट्रीट फूडचा घ्यायचाय आस्वाद? मुंबईतील 'या' 7 ठिकाणी द्या भेट
छान मऊ झालेलं असेल.एक भिजलेला सुती कपड्याचा तुकडा पोळपाटावर किव्हा प्लास्टिक पिशवीवर पसरून लिंबाएवढ्या आकाराचे पीठाचे गोळे करून वडे थापून घ्या. तेल गरम करून मध्यम आचेवर वडे व्यवस्थित तळून घ्या. वडे छान फुगतात.मग वाट कसली पाहताय !हे गरमागरम वडे गरम झणझणीत मटणाच्या किव्हा चिकनच्या रश्यासोबत वाढा,' अशी माहिती जाधव यांनी दिली.