TRENDING:

खाशील तर होशील! हिवाळ्यात बाजारीचा चटकदार पदार्थ कधी खाल्ला का? संपूर्ण रेसिपी VIDEO

Last Updated:

हिवाळ्यामध्ये पौष्टीक पदार्थ सेवन करण्यासाठी डॉक्टर सल्ला देतात. बाजरी हा पदार्थ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे बाजरीची चटपटीत खिचडी तुम्ही आहारात घेऊ शकता. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी 
advertisement

अमरावती : हिवाळ्यामध्ये पौष्टीक पदार्थ सेवन करण्यासाठी डॉक्टर सल्ला देतात. सद्यस्थितीमध्ये आहारातून ज्वारी, बाजरी आणि त्यासारखेच काही पदार्थ बाद झाले आहेत. पण, ते पौष्टीक असल्याने आहारात घेणे आवश्यक आहे. बाजरी हा पदार्थ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे बाजरीची चटपटीत खिचडी तुम्ही आहारात घेऊ शकता. ती कशी बनवायची याबद्दलच अमरावतीमधील गृहिणी जया भोंडे यांनी माहिती दिली आहे.

advertisement

बाजरीची खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

1 वाटी बाजरी, 1/2 वाटी तुरीची डाळ, कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, जिरे, हळद, मीठ, तेल/तूप हे साहित्य लागेल.

बाजरीची खिचडी बनवण्यासाठी कृती

सर्वात आधी बाजरी धुवून घ्यायची. त्यानंतर तिला थोडी बारीक करून घ्यायची जेणेकरून त्यातील काही कडक कण, कोंडा निघून जाईल. नंतर बाजरी थोडा वेळ 5 ते 10 मिनिट वाळत घालायची आणि नंतर त्याला पाखडून घ्यायचे, त्यामुळे बाजरी साफ होईल.

advertisement

हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी बनवा नाचणीचं सूप, सोपी रेसिपी लगेच नोट करा

त्यानंतर कुकरमध्ये तेल घालायचे. त्यात जिरे, लसूण, मिरची, हळद, मीठ, टोमॅटो घालून फोडणी तयार करून घ्यायची. त्यानंतर तुरीची डाळ धुवून घ्यायची आणि ती फोडणीमध्ये घालून परतवून घ्यायची. आता त्यात लागेल तसे पाणी घालायचे. त्यानंतर पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि त्यात बाजरी घालून ते परतवून घ्यायचं. बाजरी किती घेतली त्या अंदाजानुसार पाणी घालायचे. तुम्हाला दाणेदार खिचडी बनवायची असेल तर पाणी कमी घाला.

advertisement

बाजरी शिजायला कठीण असल्याने खूप वेळ घेते. त्यामुळे मध्यम आचेवर कूकरच्या 3 शिट्टी मध्यम आचेवर होऊ द्यायच्या आहेत. त्यामुळे खिचडी चांगल्या प्रकारे शिजून येईल. त्यात कोणतेही कण राहणार नाहीत.  त्यानंतर बाजरीची खिचडी खाण्यासाठी तयार होते. यासोबत तुम्ही कढी सुद्धा बनवू शकता. त्यासोबत खिचडी आणखी टेस्टी लागते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
खाशील तर होशील! हिवाळ्यात बाजारीचा चटकदार पदार्थ कधी खाल्ला का? संपूर्ण रेसिपी VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल