तिळगुळ साहित्य
पांढरे तीळ: अर्धा किलो
चिक्कीचा गूळ (किसलेला): 1 किलो
तूप: 1 -2 चमचे (ऐच्छिक)
सुंठ पावडर: 1/4 चमचा (ऐच्छिक)
वेलची पूड/जायफळ - (ऐच्छिक)
शेंगदाणे - अर्धा किलो
सुके खोबऱ्याचा कीस (ऐच्छिक): 2-3 चमचे
संक्रांतीच्या आधी भोगी का साजरी करतात? भोगीच्या भाजीची परंपरा काय? Video
तिळगुळ कृती
advertisement
तीळ भाजणे: एका जाड बुडाच्या भांड्यात तीळ मंद आचेवर सुगंध लालसर येईपर्यंत हलके भाजून घ्या. जास्त भाजू नका.
गूळ वितळवणे: दुसऱ्या भांड्यात गूळ आणि तूप एकत्र करून मंद आचेवर वितळवून घ्या. गूळ पूर्ण वितळला की फेस येईल.
मिश्रण तयार करणे: वितळलेल्या गुळात भाजलेले तीळ आणि इतर साहित्य (सुंठ, वेलची, खोबऱ्याचा कीस) टाकून चांगले मिसळा.
लाडू/वडी वळणे: मिश्रण थोडे कोमट झाल्यावर हाताला तूप लावून त्याचे छोटे लाडू किंवा वड्या वळा. करून काही वेळासाठी बाहेर ठेऊन देणे. 20 मिनिटांनंतर बंद डब्ब्यात ठेवून देणे.
टिप्स - 1. बंद डब्यात गरम लाडू ठेवल्यास 2 दिवसांतच लाडू खराब होऊन वास येऊ शकतो.
2. थंड लाडू पॅक डब्ब्यात ठेवल्यास 2 महिने आरामात टिकू शकतात.





