पाटवडी बनवण्यासाठी साहित्य (4 ते 5 जणांसाठी)
- बेसन – 1 वाटी
- आलं-लसूण पेस्ट – 1 चमचा
- हिरव्या मिरच्या- 2 बारीक चिरलेल्या
- हळद – ¼ चमचा
- हिंग – 1 चिमूट
- मीठ – चवीनुसार
- पाणी – अंदाजे 1 ते १½ कप
- तेल – 2 चमचे (मोहनासाठी), व थापण्यासाठी थोडंसं
- कांदा- 1 बारीक चिरलेला
- मोहरी- 1 चिमूट
- कडीपत्ता – 8–10
advertisement
पाटवडी बनवण्याची कृती
कढईमध्ये 2 चमचे तेल टाका, ते गरम झाले की त्यात आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, कांदा, कढीपत्ता, हळद, जिरे, मीठ सगळं टाकून लालसर परतून घ्या.
त्यात एक ग्लास पाणी घाला आणि उकळी आली की त्यात बेसनपीठ हळूहळू टाकत ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे मिश्रण गॅसवर मध्यम आचेवर ठेवून सतत हलवत शिजवा. मिश्रण घट्ट होईपर्यंत (हाताला चिकटणार नाही इतकं) शिजवा. यासाठी 7–8 मिनिटं लागतात.
एक स्टीलची थाळी, परात किंवा ट्रे घ्या. त्याला थोडंसं तेल लावून घ्या. त्यात गरम मिश्रण ओता आणि लगेचच पाट्याने किंवा ओल्या हाताने समतल थापा. थोडं थंड झाल्यावर त्याचे चौकोनी किंवा डायमंड तुकडे करा. आणि ते तव्यावर किंवा कढईत तळून घ्या. मग आपली पाटवडी तयार होईल.
गरम पाटवडी सोबत मिरचीचा ठेचा, लसूण चटणी किंवा गोड-तिखट रस्सा छान लागतो. भाकरी किंवा पोळीच्या जोडीनेही हे एक झणझणीत जेवण बनू शकतं.