हिरव्या मिरचीचे लोणचे बनविण्यासाठी लागणारे साहित्य
हिरवी मिरची, मीठ, हळद, तेल, जिरे, बडीशेप, धने पावडर, मोहरी आणि लिंबू हे साहित्य लागेल.
Winter Recipe: तुमच्या हिवाळ्यातील आहारात 'हे' लाडू हवेच; कोलेस्टेरॉलवर नैसर्गिकरित्या मात करा
हिरव्या मिरचीचे लोणचे बनविण्याची कृती
हिरव्या मिरचीचे लोणचे बनविण्यासाठी सर्वात आधी मिरची वाफवून घ्यायची आहे. त्यासाठी एका भांड्यात पाणी ठेवून त्यावर चाळणी ठेवायची. पाण्याची वाफ निघायला लागली की, त्यात मिरची टाकायची. हिरवी मिरची छान वाफवून नरम करून घ्यायची आहे. मिरची वाफवतपर्यंत मसाला तयार करून घेऊ शकता. त्यासाठी जिरे, मोहरी आणि बडीशेप जाडसर बारीक करायची आहे.
advertisement
त्यानंतर तेल गरम करून घ्यायचे आहे. तेल गरम झालं की त्यात बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हळद, मीठ आणि धने पावडर टाकून घ्यायचे आहे. नंतर मसाला थंड करून घ्यायचा आहे. तोपर्यंत मिरची वाफवून झाली असेल. मिरची वाफवून झाली की, ती मिरची सुद्धा थंड करून कोरडी करायची आहे. त्यानंतर याचे छोटे काप करायचे आहे.
छोटे काप करून झाले की, मीठ टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर लिंबाचा रस टाकून घ्या. नंतर तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. नंतर मसाला यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात तुम्हाला लागत असल्यास तुम्ही गूळ सुद्धा टाकू शकता. चटपटीत असं लोणचे तयार झाले आहे. नंतर हे लोणचे रात्रभर झाकून ठेवायचं आहे.
रात्रभर झाकून ठेवल्यानंतर सकाळी त्यात छान गूळ वगैरे मिक्स झाला असेल. लोणचे खाण्यासाठी तयार होईल. भाकरीसोबत याची चव आणखी छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.





