TRENDING:

चविष्ट अन् पौष्टिक, हिवाळ्यात करा नाचणीच्या पिठाचे सूप, पाहा संपूर्ण रेसिपी VIDEO

Last Updated:

हिवाळ्यात पौष्टिक आणि जीवनसत्त्व संपूर्ण आहार सेवन करण्याचा आपल्या सर्वांनाच डॉक्टर सल्ला देत असतात. हिवाळ्यात नाचणीच्या पीठाचे सूप कसे करायचे? जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निकता तिवारी, प्रतिनिधी 
advertisement

मुंबई : हिवाळ्यात पौष्टिक आणि जीवनसत्त्व संपूर्ण आहार सेवन करण्याचा आपल्या सर्वांनाच डॉक्टर सल्ला देत असतात. अशातच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, कडधान्य हे पर्याय हे शरीरासाठी फार आरोग्यदायी असतात. ज्वारी, बाजरी, नाचणी या सारखे कडधान्य सहज उपलब्ध होत असतात आणि ते शरीरासाठी फार उपाय कारक ठरतात. हिवाळ्यात नाचणीच्या पीठाचे सूप कसे करायचे? याबद्दलचं आपल्याला मुंबईतील गृहिणी रफीका सोलकर यांनी माहिती सांगितली आहे.

advertisement

नाचणीच्या भाकरी बद्दल आतापर्यंत आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल पण आज आपण नाचणीच्या पीठाचे सूप बनवणार आहोत.

वटाणे, फरसबी, गाजर, पनीर अशा सर्व भाज्या एकत्र वापरून चविष्ट आणि पौष्टिक असे नाचणीच्या पीठाचे सूप करता येते. फक्त घरच्या घरी 10 ते 15 मिनिटांत तुम्ही हा नाचणीच्या पीठाचे सूप तुम्ही तयार करू शकता. यासाठी तुम्हाला कोणतीही वेगळे साहित्य विकत आणावे लागणार नाही आहेत. सहज उपलब्ध होणाऱ्या असलेल्या साहित्यापासूनच तुम्ही नाचणीच्या पीठाचे सूप तयार करू शकता.

advertisement

हिवाळा स्पेशल! घरी बनवा चमचमीत मिक्स भाजी, लहान मुलंही खातील आवडीने, संपूर्ण रेसिपी VIDEO

नाचणीच्या पीठाचे सूप तयार करण्यासाठी साहित्य 

नाचणीच्या पीठाचा सूप तयार करण्यासाठी पनीर, फरसबी, वटाणे, गाजर, काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ हे साहित्य आवश्यक आहे.

नाचणीच्या पीठाचे सूप बनवण्यासाठी कृती 

सुरुवातीला आपण तुपामध्ये वटाणे, फरसबी, गाजर आणि पनीर सर्व एकत्र परतवून घ्यायचे आहेत. आणि अर्धा चमचा काळी मिरीची पावडर टाकावी. दुसरीकडे आपण पाणी गरम करुन घ्यायचे आहे. भाज्या परतावल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हवे तेवढे पाणी घालावे आणि 5 मिनिटे भाज्या या पाण्यात शिजवून घालाव्यात. त्यानंतर दुसरीकडे एका वाटीत नाचणीचे पीठ घ्यायचे. नंतर नाचणीच्या पिठात देखील गरम पाणी टाकून ढवळून घ्यावे. नाचणीचे पीठ आणि गरम पाणी हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

मिश्रण जास्त घट्ट होणार नाही याची योग्य काळजी घ्यावी. पातळ झालेले मिश्रण आता शिजणाऱ्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यावे. 5 ते 7 मिनिटे फास्ट गॅसवर नाचणीच्या पिठाचे मिश्रण आणि भाज्या एकत्र शिजवून घ्यावे. अश्याप्रकारे तुमचे चविष्ट असे नाचणीच्या पिठाचे सूप तयार होईल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
चविष्ट अन् पौष्टिक, हिवाळ्यात करा नाचणीच्या पिठाचे सूप, पाहा संपूर्ण रेसिपी VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल