शेंगोळे बनवण्यासाठी साहित्य
प्रत्येकी दोन वाटी गहू आणि ज्वारीचे पीठ, एक वाटी बेसन पीठ, चवीनुसार मीठ, हळद, आवश्यकतेनुसार तेल, हिरवी मिरची, जिरे आणि मोहरी हे साहित्य लागेल.
शेंगोळे बनवण्यासाठी कृती
सर्वप्रथम फांद्याची भाजी स्वच्छ धुऊन घ्यायची आहे. यानंतर चाकूने किंवा विळीच्या साह्याने बारीक कापून घ्यायची. दोन वाटी गहू, दोन वाटी ज्वारीचे पीठ आणि एक वाटी बेसन पीठ एकत्र करून घ्यायचं. यामध्ये बारीक चिरलेली फांद्याची भाजी घालायची. यानंतर मिक्सरमध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे, मोहरीची पेस्ट तयार करून घ्यायची. ही पेस्ट मिश्रणामध्ये घालायची. या सगळ्यांची मिळून कणिक तयार करून घ्यायची.
advertisement
कणिकेला दहा ते पंधरा मिनिटं तसंच बाजूला ठेवायचं. यानंतर हाताला थोडंसं तेल लावून सरळ किंवा गोल शेंगोळे तयार करून घ्यायचे. दुसऱ्या एका पातेल्यात जिरे, मोहरी आणि लसणाची तेलात फोडणी द्यायची. फोडणीमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. पाण्याला उकळी आल्यानंतर तयार केलेले सर्व शेंगोळे फोडणीमध्ये घालायचे. दहा ते पंधरा मिनिटे मध्यम आचेवर शिजवल्यानंतर झणझणीत अशी मराठवाडा स्टाईल शेंगोळे फळाची रेसिपी तयार होते.
ही रेसिपी लहान मुले, वृद्ध यांबरोबरच सगळेच आवडीने खातात. बनवायला अतिशय सोपी आणि चवीला अत्यंत टेस्टी असलेली ही रेसिपी तुम्ही देखील आपल्या घरी ट्राय करू शकता. फांद्याच्या भाजी ऐवजी तुम्ही कोणतीही पालेभाजी वापरू शकता.