Jwariche Dhirde: सकाळच्या वेळी आरोग्यदायी नाश्ता हवाय? 10 मिनिटांत बनवा पौष्टिक ज्वारीचे धिरडे, रेसिपीचा Video

Last Updated:

आजच्या धावपळीच्या जीवनात झटपट बनणारा, चवदार आणि आरोग्यदायी नाश्ता हवा असतो. अशा वेळी ज्वारीचे धिरडे हा एक उत्तम पर्याय ठरतो.

+
१०

१० ते १५ मिनिटांत तयार करा पौष्टिक ज्वारीचे धिरडे.

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनात झटपट बनणारा, चवदार आणि आरोग्यदायी नाश्ता हवा असतो. अशा वेळी ज्वारीचे धिरडे हा एक उत्तम पर्याय ठरतो. ज्वारी ही एक पारंपरिक आणि सुपरफूड म्हणता येईल ती पचायला हलकी, फायबरयुक्त आणि ग्लूटेन-फ्री आहे. ही रेसिपी केवळ 10-15 मिनिटांत तयार होते आणि त्यात भरपूर भाज्या घालता आल्यामुळे ती अजून पौष्टिक बनते. सकाळचा नाश्ता असो, डब्यातील खाणं असो, किंवा संध्याकाळचा हलका खाऊ ज्वारीचे धिरडे सर्वांसाठी परफेक्ट आहे.
पौष्टिक ज्वारीचे धिरडे बनवण्यासाठी साहित्य
ज्वारीचे पीठ – 1 वाटी, तांदळाचे पीठअर्धी वाटी(ऐच्छिक, कुरकुरीतपणा येतो) कांदा – 1 मध्यम, बारीक चिरलेला, टोमॅटो – 1 लहान, बारीक चिरलेला, कोथिंबीर – 2 टेबलस्पून, बारीक चिरलेली, हिरव्या मिरच्या – 1-2, बारीक चिरलेल्या, जिरं – ½ टीस्पून, मीठचवीनुसार, पाणीभिजवण्यासाठी, तेलशेकण्यासाठी, गाजर – बारीक चिरलेले हे साहित्य लागेल.
advertisement
पौष्टिक ज्वारीचे धिरडे बनवण्याची कृती
साहित्य एकत्र करणे एका मोठ्या बाउलमध्ये ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ (जर वापरत असाल), कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरं आणि मीठ घाला. पाणी घालून मिश्रण भिजवाथोडं-थोडं पाणी घालून मध्यमसर पातळसर घोळ तयार करा. (पिठलं/थालीपीठाच्या पिठापेक्षा थोडं पातळ असावंतवा गरम करा. नॉनस्टिक किंवा लोखंडी तवा गरम करून त्यावर थोडं तेल सोडा. एक पळी घोळ तव्यावर ओता आणि चमच्याने पसरवा. झाकण ठेवून मध्यम आचेवर 2-3 मिनिटं शेकून घ्या. मग उलथून दुसऱ्या बाजूनेही शेकून घ्या. तयार झालेलं धिरडं दही, लोणचं, लसूण चटणी किंवा एखाद्या चविष्ट भाजीसोबत गरम गरम सर्व्ह करा.
advertisement
टीप:
* अधिक पौष्टिक बनवण्यासाठी किसलेले गाजर, पालक, मेथी याही भाज्या मिश्रणात घालू शकता.
* लहान मुलांसाठी मिरच्या कमी घालाव्यात.
* लोखंडी तवा वापरत असल्यास व्यवस्थित तेल घालून तवा माखावा, म्हणजे धिरडं चिकटणार नाही.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
Jwariche Dhirde: सकाळच्या वेळी आरोग्यदायी नाश्ता हवाय? 10 मिनिटांत बनवा पौष्टिक ज्वारीचे धिरडे, रेसिपीचा Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement