तुरीच्या दाण्यांच्या ठेच्यासाठी लागणारे साहित्य
एक वाटी तुरीचे दाणे, चार ते पाच हिरवी मिरची, आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या, तेल, मीठ, जिरे, मोहरी आणि थोडीशी कोथिंबीर एवढं साहित्य याकरिता लागणार आहे.
थंडीचा कडाका अन् चहा प्यायचा नाही? मग घरीच बनवा कॅफे स्टाईल 'हॉट चॉकलेट', पाहा रेसिपी Video
तुरीच्या दाण्यांचा ठेचा करण्याची कृती
advertisement
सगळ्यात पहिले कढईमध्ये एक वाटी तुरीचे दाणे टाकून घ्यायचे त्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या. वरतून दोन ते तीन चमचे तेल टाकायचं त्याला छान फ्राय होऊ द्यायचं. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या देखील टाकायच्या. हे सर्व एकत्र छान फ्राय करून घ्यायचं याचा रंग बदलेपर्यंत. त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा. हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आणि त्याला जास्त बारीक नाही असं ओबडधोबड करून घ्यायचं. जास्त बारीक केलं तर त्याची चव चांगली येत नाही.
एका कढईमध्ये तेल टाकायचं दोन-तीन चमचे तेल गरम झाले की त्याला फोडणी घालायची त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची. ही फोडणी आपल्या ठेच्यावरती टाकून घ्यायची. त्यावरून थोडी हिरवी कोथिंबीर टाकायची. अशा पद्धतीने तुमचा ठेचा तयार होतो. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुम्हाला देखील आवडेल.





