पापडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
पापडा, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली कैरी, कोथिंबीर, कडीपत्ता, लाल तिखट, हळद, मीठ, जिरे, मोहरी, धनिया पावडर, तेल हे साहित्य लागेल.
तुम्हीही म्हणाल शहाणा का खुळा, MBA करून विकतोय बर्गर? पण आधी कमाईचा आकडा बघा!
पापडा बनवण्याची कृती
सर्वात आधी कढईत तेल टाकून घ्यायचे आहे. तेल थोडे गरम झाले की त्यात जिरे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरे आणि मोहरी तडतडली की, त्यात कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता आणि कांदा थोडा लालसर झाला की त्यात हळद तिखट मीठ टाकून घ्यायचे आहे. दोन मिनिट हा मसाला शिजल्यानंतर त्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो थोडे परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कैरीचे बारीक काप टाकून घ्यायचे आहे.
advertisement
हा मसाला थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचे आहे. पापड्यामध्ये थंड पाणी वापरल्यास पापडा हा मोकळा होत नाही. त्यामुळे गरम पाणी वापरणे गरजेचे आहे. पाच ते दहा मिनिटानंतर टोमॅटो शिजलेले असेल. त्यात पापडा टाकून घ्यायचा आहे. पापडा टाकून घेतल्यानंतर तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याला थोडा भाजून घ्यायचा आहे.
तोपर्यंत पाणी गरम झालेले असेल आता त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे. पाणी हे प्रमाणातच टाकून घ्यायचे आहे पाणी टाकल्यानंतर पापडा मिक्स करायचा आणि त्यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनिट शिजवून घ्यायचा आहे. दहा मिनिटानंतर पापडा शिजलेला असेल त्यात आपण कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे कोथिंबीर टाकून झाला की पापडा खाण्यासाठी तयार होतो. तुम्ही बनवून बघा, विदर्भ स्पेशल पापडा.