दही धपाटे बनवण्यासाठी साहित्य
दही धपाटे किंवा थालीपीठ तयार करण्यासाठी हुरडा, गहू, हरभऱ्याची डाळ, जिरे आणि ओवा यापासून तयार केलेलं धपाट्याचं पीठ लागेल. तसेच तेल, मीठ, हळद, एक ओला कापड आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, पालक किंवा दुधीभोपळा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एवढं साहित्य आवश्यक असते.
Home Business: धपाट्याचा स्टॉल लावला अन् सुचली बिझनेस आयडिया, आता महिलेची कमाई लाखात!
advertisement
कसं बनवायचं धपाटं?
सुरुवातीला धपाट्याचे पीठ, बारीक चिरलेली पालक आणि कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद हे सर्व मिश्रण चपातीच्या कणकीप्रमाणे सैलसर मळून घ्यायचं. यानंतर गॅसवर तवा ठेवून मंद आचेवर गरम करावा. तव्याला धपाटे चिटकू नये म्हणून थोडसं तेल टाकायचं. पोळपाटावर एक ओला कपडा अंथरायचा. यानंतर चपाती प्रमाणे थोडीशी कणीक घेऊन त्याला लाटण्याने न लाटता हातानेच चपाती प्रमाणे पांघून घ्यायचं.
चपाती प्रमाणे गोल आकार झाल्यानंतर ओल्या कापडासह धपाट्याला तव्यावर टाकायचे व ओलं कापड काढून घ्यायचं. ज्वारीच्या भाकरी प्रमाणे दोन-तीन वेळा मंद आचेवर पलटून घेतल्यानंतर गरमागरम धपाटे खाण्यासाठी तयार होते.
या धपाट्याला आपण सकाळच्या नाश्त्यासाठी दही, शेंगदाण्याची किंवा तिळाची चटणी आणि लोणचं याबरोबर सर्व्ह करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही देखील घरच्या घरी मराठवाडा स्टाईलचे दही धपाटे नक्की ट्राय करू शकता. अत्यंत कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीने तयार होणारे हे दही धपाटे अत्यंत चवदार व भूक भागवणारे असतात.