TRENDING:

पुण्याच्या भीमथडी यात्रेत गुजराती हांडवो खाल्ला का? घरीच बनवू शकता स्पेशल रेसिपी

Last Updated:

Handvo Recipe: पुण्यातील भीमथडी यात्रेत खवय्यांना गुजराती पदार्थ भुरळ घालत आहेत. यातील खांडवो रेसिपी अगदी सोप्या पद्धतीनं आपल्या घरातही बनवता येते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे : गुजरातची अशी एक वेगळी खाद्य संस्कृती आहे. पुण्यातील भीमथडी जत्रेत देखील गुजराती पदार्थांना मोठी मागणी आहे. इथे मिळणाऱ्या गुजराती हांडवो आणि थेपला या पदार्थांवर पुणेकर ताव मारताना दिसत आहेत. तुम्हालाही हा पदार्थ खायची इच्छा झाली असेल, तर अगदी सोप्या पद्धतीनं याची रेसिपी आपल्या घरातच बनवू शकता. भीमथडी यात्रेत हा पदार्थ विकणाऱ्या कविता यादव यांनीच गुजराती थेपला आणि हांडवो रेसिपी सांगितली आहे.

advertisement

कसा बनतो थेपला?

थेपला ही रेसिपी प्रामुख्याने गुजरातमध्ये बनवली जाते. गव्हाचे पीठ आणि मेथी टाकून हा पदार्थ बनवला जातो. पराठ्यासारखा असणारा हा पदार्थ अत्यंत पौष्टिक मानला जातो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत अनेकजण हा पदार्थ नाश्त्यासाठी बनवतात.

12 राज्यातील महिला बचत गट, 325 स्टॉल, पुण्यातील भीमथडी जत्रेला सुरुवात, यंदा काय आहे खास?

advertisement

हांडवो रेसिपी

गुजराती हांडवो ही रेसिपी अगदी सोपी आहे. यामध्ये वेगवेगळ्या डाळी एकत्रित करून तो बनवला जातो. तांदूळ, उडीद डाळ, तूरडाळ, चणा डाळ, मेथी दाणे, हे सर्व रात्री एकत्रित करून रात्रभर दह्यात भिजत ठेवलं जातं. सकाळी रेसिपी बनवताना किसलेली दुधी, कोथिंबीर, आले-लसूण-मिरची पेस्ट, कडीपत्ता, मीठ, साखर, हळद, मीरपूड, तीखट, तीळ, मोहरी, जिरे, हिंग, सोडा हे सर्व घटक एकत्र करून बनवले जाते. तव्यावर तेल टाकून ते भाजलं जातं. खांडवो अतिशय पौष्टिक असून कुठल्याही वेळेला करून खाऊ शकता. हे बनवण्यासाठी अगदी कमी तेल लागते, अशी माहिती कविता यादव यांनी दिली आहे.

advertisement

दरम्यान, तुम्ही देखील थेपला आणि खांडवो सारख्या पदार्थांचे चाहते असाल तर अगदी सोप्या पद्धतीने हे पदार्थ खरीच ट्राय कुरू शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
पुण्याच्या भीमथडी यात्रेत गुजराती हांडवो खाल्ला का? घरीच बनवू शकता स्पेशल रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल