TRENDING:

Winter Recipe: अनेक आजार गायब करतील जवसाचे लाडू, हिवाळ्यात बनवा आरोग्यदायी रेसिपी

Last Updated:

Winter Healthy Recipe: हिवाळ्यात आरोग्यदायी आहाराकडे सर्वांचा कल असतो. आपल्यालाही विविध आजारांपासून मुक्ती हवी असेल तर अगदी सोप्या पद्धतीनं जवसाचे लाडू बनवू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
advertisement

छत्रपती संभाजीनगर : हिवाळा सुरू झाला की आरोग्यदायी आहार घेण्याकडे सर्वांचा कल असतो. थंडीच्या दिवसांत काहींच्या घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आवर्जून बनवले जातात. यामध्ये डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू किंवा मेथीचे लाडू यांचाही समावेश असतो. या काळात तुम्ही अत्यंत आरोग्यदायी आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणाऱ्या जवसाचे लाडू देखील बनवू शकता. छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी बनवायला अगदी सोपी आणि आरोग्यदायी जवसांच्या लाडूंची रेसिपी सांगितली आहे.

advertisement

जवसाच्या लाडूसाठी साहित्य

एक वाटी जवस, अर्धा वाटी अक्रोड, अर्धा वाटी खजूर, एक वाटी गूळ, दोन चमचे पंपकिन सीड, एक चमचा खसखस आणि थोडसं तूप एवढे साहित्य लागेल. जवस, अक्रोड आणि पंपिंग सीड यामध्ये ओमेगा थ्री हे मोठ्या प्रमाणात असतं आणि ते आपलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं.

ग्रीन टीपेक्षाही लाभदायक ठरतो हा निळा चहा; जाणून घ्या, नेमके काय फायदे होतात?, VIDEO

advertisement

लाडू बनविण्याची कृती

सर्वप्रथम एक वाटी जवस चांगल्या रीतीने भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडसं तूप टाकून अक्रोड भाजायचं आणि पंपिंग सीड देखील भाजून घ्यायच्या. त्यानंतर थोडसं तूप टाकून खजूर देखील चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं. आता हे भाजून घेतलेले साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं. एका पॅनमध्ये थोडसं पाणी घालायचं आणि त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा गुळ व्यवस्थित रित्या पातळ करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा खसखस टाकायची. हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं.

advertisement

सर्व मिश्रण भाजून झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण पावडर तयार करून घेतली आहे ती टाकायची आणि एकजीव करून घ्यायची. एक छोटा चमचा भरून त्यामध्ये तूप देखील तुम्ही टाकू शकता. सर्व एकत्र करून एकजीव करून घ्यायचं. थोडसं थंड झाल्यानंतर याचे लाडू बनवून घ्यायचे. अशा सोप्या पद्धतीने हे लाडू तयार होतात.

अपचन, केस गळती अन् त्वचा विकारांवर रामबाण, हिवाळ्यात रोज आवळा खाण्याचे जबरदस्त फायदे

advertisement

आरोग्यासाठी लाभदायी जवस

जवस हे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानलं जातं. त्यामुळे हिवाळ्यात आवर्जून जवस खाण्याचा सल्ला दिला जातो. जवसात फायबरचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे ते हाय कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करण्याच काम करतं. तसेच जवस वजन कमी करण्यासाठी देखील लाभदायी आहे. हिवाळ्यात सातत्याने भूक लागते. अशावेळी जवसाचे लाडू उत्तम पर्याय ठरतात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Winter Recipe: अनेक आजार गायब करतील जवसाचे लाडू, हिवाळ्यात बनवा आरोग्यदायी रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल