लाल मुळा आणि पांढऱ्या मुळ्यामधील फरक
रंग आणि चव
लाल मुळा : याचा रंग फिकट लाल किंवा गुलाबी असतो. चवीला तो किंचित गोडसर आणि कमी तिखट असतो.
पांढरा मुळा : हा लांबट आणि पांढऱ्या रंगाचा असतो. त्याची चव थोडी जास्त तिखट आणि कडू असू शकते.
लाल मुळा आणि पांढऱ्या मुळ्यामधील पोषणमूल्ये
advertisement
- दोन्ही मुळ्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन C, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
- लाल मुळ्यामध्ये अँथोसायनिन आणि बीटा-कॅरोटीन जास्त प्रमाणात असतात, जे त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात.
- पांढऱ्या मुळ्यामधे पाण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे ते हायड्रेशन आणि डिटॉक्ससाठी अधिक चांगले मानले जाते.
पचनावर परिणाम
- लाल मुळा हलका आणि लवकर पचणारा असतो.
- पांढरा मुळा गॅस आणि आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांना कधी कधी त्रास देऊ शकते.
मुळा खाण्याचे आरोग्य फायदे..
लाल मुळा
- रोगप्रतिकारशक्ती वाढवते. व्हिटॅमिन C भरपूर असल्याने सर्दी-खोकल्यापासून बचाव करते.
- त्वचा आणि केसांसाठी चांगला. यात असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला चमक देतात.
- हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
पांढरा मुळा
- डिटॉक्सिफिकेशनसाठी उत्तम. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.
- पचन सुधारते. फायबर मुबलक असल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
- वजन कमी करण्यास उपयुक्त. कमी कॅलरी आणि जास्त पाणी असल्याने वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम आहे.
कोणता मुळा जास्त फायदेशीर?
- जर तुम्ही त्वचा, डोळे आणि रोगप्रतिकारशक्तीवर लक्ष केंद्रित करत असाल, तर लाल मुळा अधिक चांगला आहे.
- जर तुम्हाला डिटॉक्स, हायड्रेशन आणि वजन नियंत्रण हवे असेल, तर पांढरा मुळा निवडा.
- दोन्ही मुळे आहारात समाविष्ट करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
मुळा कशाप्रकारे खाणं फायदेशीर..
- मुळा सॅलड, पराठा, सांबार किंवा लोणच्याच्या स्वरूपात खाऊ शकता.
- जास्त प्रमाणात कच्चा मुळा खाल्ल्यास गॅसचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे संतुलित प्रमाणातच घ्या.
- लाल आणि पांढरा मुळा दोन्हीही हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. फरक फक्त पोषणमूल्ये आणि चवीत आहे. आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार दोन्ही मुळे आहारात समाविष्ट करा आणि हिवाळ्याचा आनंद घ्या.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
