अलीकडेच, भारतातील कर्करोगाचे नवीन ट्रेंड आणि स्थिती समजून घेण्यासाठी अभ्साय करण्यात आला. लोकसंख्या-आधारित कर्करोग नोंदणी केंद्रे देशातील विविध प्रदेशांमध्ये कर्करोगाच्या नवीन प्रकरणांची, मृत्यूची आणि वाढत्या ट्रेंडची माहिती गोळा करतात. भारतातील सध्याच्या 43 कर्करोग नोंदणी केंद्रांमध्ये 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसंख्येच्या 10% ते 18% लोकसंख्येचा समावेश आहे. 2015-19 च्या या नोंदणी केंद्रांच्या आकडेवारीच्या आधारे, संशोधकांनी कर्करोगाच्या घटनांमध्ये प्रमुख ट्रेंड ओळखले आहेत.
advertisement
या नोंदणींमधून असं दिसून आलं की भारतातील लोकांना त्यांच्या आयुष्यात कर्करोग होण्याचा धोका सुमारे 11% आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक 100 पैकी 11 लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी कर्करोग होऊ शकतो.
महिलांना कॅन्सरचा अधिक धोका
या आकडेवारीनुसार भारतात नोंदवलेल्या सर्व कर्करोग प्रकरणांपैकी 51.1% महिलांमध्ये आहेत म्हणजेच महिला कर्करोगाला जास्त बळी पडत आहेत. पण दिलासा देणारी बाब म्हणजे कर्करोगाने ग्रस्त महिलांमध्ये मृत्युदर 45% आहे.
आयसीएमआर - नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्चचे संचालक आणि देशाच्या कर्करोग नोंदणीचे समन्वयक डॉ. प्रशांत माथूर यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की महिलांमध्ये कर्करोगाचे अधिक रुग्ण आढळले आहेत आणि त्यापैकी सुमारे 40% रुग्णांना स्तनाचा किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आहे. हे सामान्य कर्करोग लवकर शोधता येतात आणि उपचार चांगले परिणाम देतात. यामुळेच महिलांमध्ये या कर्करोगांमुळे होणाऱ्या मृत्युदराचं प्रमाण कमी आहे.
एम्सचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. अभिषेक शंकर म्हणाले की, पुरुषांना सहसा फुफ्फुस आणि पोटाच्या कर्करोगाचा त्रास होतो, ज्यावर उपचार करणं अधिक कठीण असतं. स्तनाचा कर्करोग लवकर ओळखणं सोपं असतं कारण महिलांना स्वतः गाठ जाणवू शकते. दुसरीकडे, फुफ्फुसाच्या कर्करोगाची कोणतीही ओळखण्यायोग्य लक्षणं नसतात, ज्यामुळे ते ओळखणं कठीण होतं आणि उपचारांना विलंब होतो. यामुळे मृत्युदरात लक्षणीय वाढ होते.
Milk Tea Recipe : दूध आधी घालायचं की पाणी उकळल्यावर? परफेक्ट दुधाचा चहा बनवण्याची पद्धत
देशात तोंडाच्या कर्करोगाच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. आकडेवारीवरून असं दिसून येतं की पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाने फुफ्फुसाच्या कर्करोगाला मागे टाकलं आहे, जो सर्वात सामान्य कर्करोग आहे. भारतात तोंडाच्या कर्करोगाचा सर्वात मोठा धोका असलेल्या तंबाखूचं सेवन कमी होत असताना ही परिस्थिती आहे.
जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणानुसार, 2009-10 ते 2016-17 दरम्यान तंबाखू सेवन करणाऱ्या प्रौढांचं प्रमाण 34.6% वरून 28.6% पर्यंत कमी झालं आहे. डॉक्टरांच्या मते, आता तंबाखूव्यतिरिक्त, मद्यपान हे तोंडाच्या कर्करोगाचं कारण असू शकतं. अल्कोहोलमुळे केवळ यकृताच्या कर्करोगाचा धोकाच नाही तर तोंड, घसा, पोट आणि मोठ्या आतड्यांचा कर्करोग देखील होतो. जेव्हा अल्कोहोल आणि तंबाखू दोन्ही वापरले जातात तेव्हा हा धोका आणखी वाढतो.
या राज्यात कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण
या अभ्यासातून असं दिसून आलं की भारतात कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण ईशान्येकडील राज्यांमध्ये आहेत. इथं महिलांमध्ये गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग आणि तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळलं. यामागे अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कारणं आहेत. येथील पुरुष आणि महिला अधिक तंबाखूचे सेवन करतात. येथील अन्नात मसालेदार अन्न, स्मोक्ड आणि कोरडे मांस, मासे यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये हेलोबॅक्टर, हेपेटायटीस आणि एचपीव्ही सारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण देखील जास्त आहे, जे अनेक कर्करोगांमध्ये कर्करोग निर्माण करणारे म्हणून काम करू शकतात. भारतातील मिझोराम राज्यात आयुष्यभर कर्करोग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. येथे पुरुषांमध्ये हा धोका 21.1% आणि महिलांमध्ये 18.9% आहे, जो राष्ट्रीय सरासरी 11% पेक्षा खूपच जास्त आहे.