कोणी केलं वजन कमी?
भारतीय क्रिकेटर सरफराज खान याच्या वडिलांनी त्यांच्या शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशनने सर्वानाच आश्चर्यचकित केले आहे. काही महिन्यांपूर्वी सरफराज खाननेही त्याच वजन कमी केलं होत. आता त्याचे वडील आणि पूर्व क्रिकेटर नौशाद खान यांनीही फक्त 5 महिन्यात 33 किलो वजन कमी केले आहे. सरफराज खानने त्यांच्या या ट्रान्सफॉर्मेशनचा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे, जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
advertisement
वडिलांना चिडवायचा सरफराज
सरफराजच्या वेट लॉस जर्नीमध्ये त्याच्या वडिलांनी देखील तेवढीच मेहनत घेतली आहे. त्यांनी सांगितलं की जेव्हा मी त्याला त्याच वजन कमी करण्यात मदत करत होतो तेव्हा तो मला चिडवायचा. तो माझा पोटाला चिमटा काढून विचारायचा की 'हे काय आहे'? असं नौशाद खान यांनी टीओआयला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. ते पुढे म्हणाले, आमचं संपूर्ण कुटुंब वजन कमी करायच्या मिशनवर असल्याचं ते म्हणाले. सरफराजनेही 6 आठवड्यात 9 किलो वजन कमी केले होते, जे इतके सोपे नव्हते.
कसं केलं वजन कमी?
त्यांनी सांगितले की, स्ट्रिक्ट डायट आणि व्यायाम याच्या मदतीने त्यांनी त्यांच्या वजनावर नियंत्रण मिळवले. नौशादच्या परिवर्तनाने केवळ त्यांच्या क्रिकेटपटू मुलांना प्रेरणा दिली नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या फिटनेससाठीच्या सामूहिक वचनबद्धतेवरही प्रकाश टाकला आहे. “मी येथे येण्यासाठी कठोर परिश्रम केले आणि मला आनंद आहे की मी ५५ व्या वर्षी हे करू शकलो,” असे नौशाद म्हणाले.