उभे राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम आणि धोके
उभ्याने वेगाने पाणी पिण्याच्या सवयीमुळे दीर्घकाळात अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
सांधेदुखीचा धोका: उभे राहून पाणी प्यायल्याने सांध्यांमध्ये असलेल्या द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते. हे द्रव सांध्यांमध्ये जमा होऊन कालांतराने सांधेदुखी आणि संधिवातचा त्रास वाढू शकतो.
पचनसंस्थेवर परिणाम: पाणी वेगाने पोटाच्या खालच्या भागात पोहोचल्यामुळे पोटातील ऍसिड योग्य प्रकारे पातळ होत नाही. यामुळे अपचन, गॅस आणि ऍसिडिटीची समस्या वाढते.
advertisement
किडनीवर ताण: उभे राहून पाणी प्यायल्याने किडनी ते व्यवस्थित फिल्टर करू शकत नाही. पाणी वेगाने वाहून गेल्याने, पाण्यातील अशुद्धी आणि विषारी पदार्थ किडनी आणि मूत्राशयात जमा होऊ शकतात, ज्यामुळे किडनीचे विकार आणि मूत्रमार्गात संसर्ग होण्याचा धोका असतो.
फुफ्फुसे आणि हृदयावर परिणाम: घाईत उभे राहून पाणी प्यायल्यास फुफ्फुसांवर दाब पडू शकतो. यामुळे ऑक्सिजनच्या पातळीत तात्पुरता असमतोल निर्माण होतो, जे फुफ्फुस आणि हृदयाच्या कार्यासाठी योग्य नाही.
तहान न भागणे: उभ्याने वेगाने पाणी प्यायल्यास ती केवळ पोट भरल्यासारखे वाटते, पण तहान पूर्णपणे शमत नाही. त्यामुळे थोड्या वेळाने पुन्हा तहान लागते.
मज्जासंस्थेवर ताण: उभ्याने पाणी पिताना शरीर 'फाईट अँड फाईट' मोडवर असते, म्हणजेच ताणलेल्या स्थितीत असते. यामुळे मज्जासंस्थेवर ताण येतो, तर बसून पाणी प्यायल्यास शरीर शांत आणि आरामदायी स्थितीत असते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
