मक्याच्या दरात सुधारणा
राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 9 हजार 807 क्विंटल मक्याची एकूण आवक झाली. यापैकी जळगाव मार्केटमध्ये 2400 क्विंटल लाल मक्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 1626 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 310 क्विंटल मक्यास 2800 ते 3500 रुपये दरम्यान सर्वाधिक भाव मिळाला.
advertisement
Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, पाऊस इज बॅक, 17 जिल्ह्यांना अलर्ट
कांदा उच्चांकी आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 2 लाख 16 हजार 224 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 83 हजार 818 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 388 ते जास्तीत जास्त 1691 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 14908 क्विंटल कांद्यास 1800 रूपयांप्रमाणे सर्वसाधारण बाजार भाव मिळाला.
सोयाबीन आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 1लाख, 47 हजार 773 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये सर्वाधिक 35 हजार 033 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3813 ते 4340 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच बुलढाणा मार्केटमध्ये 1850 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास प्रतीनुसार 3700 ते 4560 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.





