दूध आणि चिया सीड्स एकत्र खाण्याचे 5 दुष्परिणाम
पचनसंस्थेवर परिणाम
चिया सीड्समध्ये भरपूर फायबर असते. जर तुम्ही त्या भिजवल्याशिवाय दुधात मिसळल्या, तर पोटात गेल्यावर त्या फुगतात. यामुळे पोट फुगणे, गॅस आणि पोटदुखी सारख्या पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
पोषक तत्वांचे शोषण थांबते
चिया सीड्समधील फायबर आणि दुधातील कॅल्शियम यांच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. यामुळे शरीराला दोन्हीतील पोषक तत्वे पूर्णपणे शोषून घेणे कठीण होते.
advertisement
कमी रक्तदाबाचा धोका
चिया सीड्स रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. जर तुम्हाला आधीच लो ब्लड प्रेशरचा त्रास असेल, तर दुधासोबत चिया सीड्स खाल्ल्याने रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो, ज्यामुळे चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.
ॲलर्जीचा धोका
काही लोकांना चिया सीड्सची ॲलर्जी असू शकते. अशावेळी, दूध आणि चिया सीड्स एकत्र खाल्ल्यास शरीरावर पुरळ उठणे किंवा खाज येण्यासारख्या समस्या होऊ शकतात.
रक्तातील साखर कमी होणे
चिया सीड्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. पण, जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि औषधे घेत असाल, तर या मिश्रणामुळे रक्तातील साखर जास्तच कमी होऊ शकते, जे धोकादायक ठरू शकते.
योग्य पद्धत काय?
चिया सीड्स खाण्याची सर्वात योग्य पद्धत म्हणजे त्या किमान 30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. पूर्णपणे फुगल्यानंतर तुम्ही त्या दुधात किंवा स्मूदीमध्ये मिसळू शकता. यामुळे पचनाच्या समस्या येणार नाहीत. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)