TRENDING:

Make Up : मेकअप केल्यानं त्वचेचं नुकसान होतं का ? मेकअप व्यवस्थित काढण्यासाठी त्वचाविकार तज्ज्ञांनी दिल्यात महत्त्वाच्या टिप्स

Last Updated:

त्वचारोगतज्ज्ञ आश्का शाह यांनी इंस्टाग्राम हँडलवर मेकअप संदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत त्यांनी, मेकअपबद्दलच्या गैरसमजांविषयी माहिती दिली आहे. मेकअपमुळे त्वचा वृद्ध दिसत नाही किंवा वृद्धत्वाची लक्षणं वाढत नाहीत. मेकअपचा चुकीचा वापर ही खरी समस्या असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच रोज मेकअप करणाऱ्यांसाठी त्यांनी काही टिप्सही दिल्यात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मेकअप केल्यानं चेहरा खुलून दिसतो. बहुतेक महिलांना मेकअप करायला आवडतं. पण काहींना नोकरीच्या ठिकाणी पूर्ण मेकअप नाही पण थोडं टचअप करावं लागतं.
News18
News18
advertisement

मेकअप आवडत असला तरी अनेकांना त्यामुळे एक भीती देखील असते. मेकअप लावल्यानं त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो आणि विशेषतः दररोज मेकअप लावल्यानं त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणं लवकर दिसतील अशी शंका असते.

त्वचारोगतज्ज्ञ आश्का शाह यांनी इंस्टाग्राम हँडलवर मेकअप संदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत त्यांनी, मेकअपबद्दलच्या गैरसमजांविषयी माहिती दिली आहे. मेकअपमुळे त्वचा वृद्ध दिसत नाही किंवा वृद्धत्वाची लक्षणं वाढत नाहीत. मेकअपचा चुकीचा वापर ही खरी समस्या असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच रोज मेकअप करणाऱ्यांसाठी त्यांनी काही टिप्सही दिल्यात.

advertisement

Eggs Intake : दररोज किती अंडी खाणं योग्य ? रोज अंडी खाण्याचे काय फायदे ?

मेकअप योग्यरित्या काढत नाही, मेकअप लावून झोपता किंवा मेकअप करताना स्किनकेअर रूटीनकडे दुर्लक्ष करता तेव्हा त्याचा त्वचेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे छिद्रं बंद होऊ शकतात, मुरुमं वाढू शकतात, चेहरा निस्तेज होऊ शकतो आणि एलर्जी येऊ शकते. यामुळे, त्वचा थकलेली आणि जुनी दिसते.

advertisement

मेकअपमुळे त्वचेवर वय वाढलेलं दिसतं. योग्य उत्पादनं वापरली आणि त्वचेची चांगली काळजी घेतली तर मेकअपमुळे नुकसान होणार नाही. सध्या, अनेक मेकअप उत्पादनांमधे एसपीएफ, मॉइश्चरायझिंग आणि त्वचेला अनुकूल घटक असतात. म्हणून, मेकअप करणं सुरक्षित आहे. काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे.

Detox Drink : चेहऱ्यावरच्या नॅचरल ग्लोसाठी बनवा खास डिटॉक्स ड्रिंक, पाहूया कृती

advertisement

दररोज मेकअप करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

दररोज मेकअप करत असाल तर काही गोष्टींबद्दल विशेषतः काळजी घ्या

झोपण्यापूर्वी मेकअप पूर्णपणे काढून टाका.

त्वचेच्या प्रकारानुसार मेकअप उत्पादनं निवडा.

दिवसा सनस्क्रीन लावायला विसरू नका.

मेकअप केल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोन मित्रांनी ठरवलं! बिझनेस आयडियाने सगळ्यांचं मन जिंकलं, मुंबईतच नाही तर परराज्
सर्व पहा

या सर्वांव्यतिरिक्त, आठवड्यातून एक-दोन वेळा हलकं एक्सफोलिएशन करा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Make Up : मेकअप केल्यानं त्वचेचं नुकसान होतं का ? मेकअप व्यवस्थित काढण्यासाठी त्वचाविकार तज्ज्ञांनी दिल्यात महत्त्वाच्या टिप्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल