हिवाळ्यात कायम जाणवणारी समस्या म्हणजे ओठ फाटणं, ओठ कोरडे होणं. वाढत्या कोरडेपणामुळे ओठ कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात आणि कधीकधी जास्त कोरडे झाल्यानं वेदना देखील होऊ शकतात.
हिवाळ्यात कोरड्या झालेल्या ओठांसाठी घरगुती उपचार अत्यंत परिणामकारक ठरतात. यासाठी केशर लिप बाम तुम्ही घरी बनवू शकता. यामुळे कोरड्या हवेमुळे फाटलेले ओठ चमकदार आणि मऊ राहतील.
advertisement
Skin Care : छोटा पॅक, बडा फायदा, वाचा या छोट्या बियांचे त्वचेसाठी मोठे फायदे
केशर लिप बाम बनवण्यासाठी लागणारं साहित्य:
केशर
ग्लिसरीन
नारळ तेल
व्हिटॅमिन ई कॅप्सूल
घरी केशर लिप बाम कसा बनवायचा -
घरी केशर लिप बाम बनवणं खूप सोपं आहे. यासाठी, एका भांड्यात दोन चमचे नारळ तेल, अर्धा चमचा ग्लिसरीन, चिमूटभर केशर आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल एकत्र करा. तिन्ही घटक व्यवस्थित मिसळा. एका भांड्यात पाणी उकळू द्या. उकळत्या पाण्याच्या भांड्यावर एक ताटली ठेवा आणि त्यावर मिश्रण असलेलं भांडं ठेवा आणि झाकण ठेवा. या मिश्रणाला काही मिनिटं चांगली वाफ येऊ द्या. नंतर, मिश्रण एका डबीमधे भरा आणि सेट होण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. नैसर्गिक केशर लिप बाम तयार आहे.
Dark Circles : डोळ्यांखाली काळी वर्तुळं का येतात ? वाचा खास स्किन केअर टिप्स
नैसर्गिक केशर लिप बामचे फायदे -
हे नैसर्गिक केशर लिप बाम फाटलेल्या ओठांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्याच्या घटकांमधे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे फाटलेले, कोरडे झालेले ओठ मऊ राहतात.
नैसर्गिक केशर लिप बाममुळे त्वचेला चांगलं पोषण मिळतं, ज्यामुळे ओठ फाटण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
