जीवनसत्त्वं आणि खनिजांची कमतरता - त्वचातज्ज्ञांच्या मते, लोह, हिमोग्लोबिन आणि व्हिटॅमिन डीची कमतरता हे एक कारणीभूत घटक असू शकते.
थायरॉईड असंतुलन - थायरॉईडची समस्या असताना तोंडाभोवती रंगद्रव्य प्रथम दिसून येतं.
सूर्यप्रकाश आणि डिहायड्रेशन - जास्त वेळ उन्हात राहिल्यानं किंवा त्वचेला योग्यरित्या मॉइश्चरायझ न केल्यानं देखील काळेपणा वाढतो.
Snoring : घोरणं कसं थांबवायचं ? हे पाच उपाय ठरतील फायदेशीर, वाचा सविस्तर माहिती
advertisement
त्वचातज्ज्ञ निपुण कपूर यांनी याबद्दलचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्वचा अचानक काळी पडू लागली, सर्वात आधी संपूर्ण रक्त तपासणी करावी. यात लोह, हिमोग्लोबिन, व्हिटॅमिन डी आणि थायरॉईडची तपासणीही होते.
काही कमतरता असतील तर डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सप्लिमेंट्स घेऊ शकता. तीन-चार महिने नियमितपणे योग्य सप्लिमेंट्स घेतल्यानं शरीर आतून निरोगी होण्यास मदत होईल आणि त्याचे परिणाम त्वचेवर स्पष्टपणे दिसून येतील.
त्वचेची काळजी केवळ अंतर्गत आरोग्यासाठीच नाही तर बाह्य आरोग्यासाठी देखील महत्त्वाची आहे. हे साध्य करण्यासाठी, सकाळी आणि रात्री योग्य त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या पाळणं गरजेचं आहे.
सकाळची दिनचर्येत चेहरा धुतल्यानंतर, अल्फा अर्बुटिन आणि नियासिनमाइड लावा. त्वचेला व्हिटॅमिन सी अनुकूल असेल तर त्यावर अल्फा अर्बुटिन लावा. आय क्रीम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावा.
आठवड्यातून तीन वेळा रात्री अॅझेलेइक अॅसिड आणि नियासिनमाइड वापरा. आठवड्यातून दोनदा रेटिनॉल आणि नियासिनमाइड लावा. इतर वेळा कोजिक अॅसिड आणि नियासिनमाइड यांचं मिश्रण वापरण्याचा सल्ला निपुण यांनी या व्हिडिओत दिला आहे. ही उत्पादनं वापरल्यानंतर दररोज रात्री तुमच्या चेहऱ्यावर बॅरियर रिकव्हरी क्रीम लावा. यामुळे त्वचा कोरडी राहत नाही.
प्रत्येक उत्पादन वापरण्यापूर्वी नेहमीच पॅच टेस्ट करा असा सल्लाही निपुण यांनी दिला आहे. त्वचेवर जळजळ जाणवली, खाज सुटली किंवा अॅलर्जी जाणवत असेल तर ताबडतोब वापर बंद करा. या सर्वांव्यतिरिक्त, उन्हात बाहेर पडताना नेहमी सनस्क्रीन वापरा.
या सोप्या गोष्टी लक्षात ठेवून आणि त्वचेची योग्य काळजी घेतली तर ओठांभोवतीचा काळेपणा सहजपणे कमी करता येतो. याचे परिणाम दिसण्यासाठी किमान दोन-तीन महिने लागू शकतात.