अमरावती : मकर संक्रांती जवळ आली आहे. त्यामुळे महिलांची नवनवीन वस्तूंची खरेदी सुरू झाली आहे. मकर संक्रांतीला हळदी कुंकू कार्यक्रम करण्यासाठी अनेक प्रकारचे सजावट साहित्य महिला खरेदी करत आहेत. सध्या मार्केटमध्ये व्हाइट मेटलच्या वेगवेगळ्या वस्तू आलेल्या आहेत. सुंदर असे आरतीचे ताट, समई, हळदी कुंकवासाठी वेगवेगळ्या डिझाईनच्या करंडा प्लेट अशा अनेक आकर्षक वस्तू आहेत. तुम्हाला खरेदी करायचे असल्यास अमरावतीमधील दस्तुरनगर येथे तुम्हाला 50 रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंत व्हाइट मेटलचे सर्व भांडे मिळू शकतात.
advertisement
अमरावतीमधील दस्तुरनगर येथील विक्रेत्या रेवती सवई यांनी दिलेल्या माहितीनुसार, मकर संक्रांती स्पेशल म्हणून व्हाइट मेटलच्या अनेक वस्तू मार्केटमध्ये नवीन आहेत. जसे हळदी कुंकवासाठी लागणारे साहित्य आरतीचे ताट, समई, करंडा, कलश या सर्व वस्तूमध्ये नवनवीन डिझाईन उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचबरोबर शो पीसमध्ये हत्तीची जोडी, हरिनाची जोडी, मोर यासारखे अनेक शो पिस व्हाइट मेटलमध्ये उपलब्ध आहेत.
Makar Sankranti: हळदीकुंकवाचा कार्यक्रम होईल कमी बजेटमध्ये, फक्त 10 रुपयांमध्ये वाण साहित्य
किंमत किती आहे?
रेवती यांनी सांगितले की, व्हाइट मेटलमध्ये 50 रुपयांपासून वस्तूची किंमत सुरू होते आणि 3 हजारांपर्यंत किंमतीच्या वस्तू आमच्याकडे उपलब्ध आहेत. सगळ्यात छोटा चौरंग हा 50 रुपयांपासून सुरू होतो. त्यानंतर छोटे दिवे सुद्धा 50 रुपयांपासून मिळतात. मोठ्या समई 1800 रुपयांपासून आमच्याकडे उपलब्ध आहेत. वस्तूंची साईज आणि आकर्षकता बघून प्रत्येक वस्तूची किंमत वेगवेगळी आहे.
व्हाइट मेटलची विशेषता काय?
व्हाइट मेटलमुळे सजावट आकर्षक दिसेलच पण याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या भांड्यांची चमक कधीही कमी होत नाही. आता जसे आहेत तसेच ते नेहमी साठी राहतात. त्याचा कलरही जात नाही. कोणतेही लिक्वीड तुम्ही वापरले तरी भांडी अगदी जशीच्या तशी राहतील. त्यामुळे महिलांचे एक काम कमी होते. त्यामुळे महिलांकडून व्हाइट मेटलला खूप मागणी आहे. संक्रांतीला मुलीच्या सासरी वाण म्हणून देण्यासाठी अनेक महिला खरेदी करत आहेत. व्हाइट मेटल हे कधीही काळे पडत नाही, असेही त्या सांगतात.





