सायनोसायटिस ही केवळ तात्पुरती समस्या नाही तर रोगप्रतिकारक शक्ती आणि शरीराच्या एकूण आरोग्याशी जोडलेला एक आजार आहे. सायनस म्हणजे डोळे आणि नाकाभोवती कवटीच्या आत असलेली जागा. सायनस हे हवेनं भरलेली पोकळी, नाक स्वच्छ आणि ओलसर ठेवण्यासाठी श्लेष्मा स्राव करणं हे त्यांचं काम. या पोकळ्यांना सूज येते किंवा संसर्ग होतो तेव्हा त्याला सायनुसायटिस म्हणतात.
advertisement
या आजाराची लक्षणं संसर्गाच्या स्थानानुसार बदलू शकतात. उदाहरणार्थ, जर मॅक्सिलरी सायनसला सूज आली असेल तर गाल आणि वरच्या दातांत वेदना जाणवू शकतात. फ्रंटल सायनसच्या समस्यांमुळे कपाळावर वेदना होतात. इथमॉइड सायनसमुळे डोळ्यांच्या दरम्यान वेदना होतात, तर स्फेनोइड सायनसमुळे डोकं आणि मानेच्या मागच्या भागात वेदना होतात.
याशिवाय, सतत नाक बंद राहणं, वासाची जाणीव कमी होणं, डोकेदुखी, डोळ्यांभोवती दाब येणं, चेहऱ्यावर जडपणा येणं आणि कधीकधी ताप येणं ही देखील त्याची मुख्य लक्षणं आहेत. सायनुसायटिस अनेक कारणांमुळे होऊ शकतो, ज्यामध्ये धूळ, धूर, परागकण किंवा परफ्यूम यासारख्या गोष्टींपासून होणारी ऍलर्जी यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, नाकाचं हाड वक्र होणं, विषाणूजन्य, जीवाणूजन्य किंवा बुरशीजन्य संसर्ग आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती यामुळे देखील सायनसचा त्रास जाणवू शकतो. ताणतणाव आणि असंतुलित जीवनशैलीमुळे हा त्रास आणखी वाढू शकतो.
आयुर्वेदात सायनुसायटिसपासून मुक्त होण्यासाठी अनेक घरगुती उपाय सांगितले आहेत. नस्य उपचारांमधे, दररोज सकाळी आणि संध्याकाळी नाकात मोहरीचं तेल किंवा तूपाचं दोन थेंब टाकणं हे उपचार सांगितले आहेत.
Uric Acid : युरिक अॅसिड कमी होण्याचे शरीरावर होतात परिणाम, वाचा लक्षणं, कारणं आणि उपचार
पाण्यात ओवा किंवा पुदिना घालून वाफ घेणं, तुळस आणि आल्याचा काढा पिणं, हळदीचं दूध पिणं आणि त्रिकटू पावडर खाल्ल्यानं कफ आणि श्लेष्मा कमी होऊन संसर्ग कमी होतो. त्रिकटू म्हणजे पिंपळी, मिरपूड, सुंठ या तीन मसाल्यांचं मिश्रण.
सायनसच्या रुग्णांसाठी तळलेले आणि जड पदार्थ टाळणं आणि हलका, पौष्टिक आणि पचण्याजोगा आहार घेणं देखील फायदेशीर आहे. ही स्थिती टाळण्यासाठी, काही खबरदारी घेणं महत्वाचं आहे. धूळ, धूर आणि प्रदूषणापासून स्वतःच रक्षण करणं गरजेचं आहे.
हवामानानुसार शरीर झाकणं, जेणेकरुन बदलणाऱ्या हवेचा शरीरावर परिणाम कमी होण्यास मदत होईल. थंड पेयं किंवा शिळं अन्न खाणं टाळा. नियमित योगासनं आणि प्राणायामामुळे श्वसनसंस्था मजबूत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. ताणतणाव आणि असंतुलित जीवनशैलीमुळे हा आजार वाढू शकतो.