Uric Acid : युरिक अ‍ॅसिड कमी होण्याचे शरीरावर होतात परिणाम, वाचा लक्षणं, कारणं आणि उपचार

Last Updated:

युरिक अ‍ॅसिडच्या वाढलेल्या पातळीमुळे संधिवात, सांधेदुखी किंवा किडनी स्टोन या समस्या जाणवतात. पण, युरिक अ‍ॅसिडची कमी पातळीही शरीरासाठी तितकीच धोकादायक असू शकते. युरिक अ‍ॅसिड हे आपल्या शरीरातील एक नैसर्गिक रसायन आहे जे प्युरिन नावाच्या घटकाच्या विघटनामुळे तयार होतं.

News18
News18
मुंबई : शरीरातल्या आवश्यक घटकांच्या आवश्यक पातळीत चढ - उतार झाले की, आरोग्यावर त्याचे परिणाम जाणवतात. युरिक अ‍ॅसिड वाढल्यावर त्याचे होणारे परिणाम आपण ऐकून असतो, काहींना त्याचा त्रासही जाणवतो.
युरिक अ‍ॅसिडच्या वाढलेल्या पातळीमुळे संधिवात, सांधेदुखी किंवा किडनी स्टोन या समस्या जाणवतात. पण, युरिक अ‍ॅसिडची कमी पातळीही शरीरासाठी तितकीच धोकादायक असू शकते. युरिक अ‍ॅसिड हे आपल्या शरीरातील एक नैसर्गिक रसायन आहे जे प्युरिन नावाच्या घटकाच्या विघटनामुळे तयार होतं.
प्युरिन हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं आणि शरीराचं संरक्षण करतं. याचं प्रमाण खूप कमी झालं तर शरीराची रोगप्रतिकारक क्षमता आणि अनेक अवयवांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
advertisement
युरिक अ‍ॅसिड कमी होण्याची कारणं
- जास्त पाणी पिणं किंवा डिहायड्रेशन
- बऱ्याच काळापासून सुरु असलेली औषधं, (युरिक अ‍ॅसिड कमी करणारी औषधं)
- यकृत किंवा मूत्रपिंडाच्या समस्या
- जास्त व्यायाम किंवा उपवास.
- अनुवांशिक कारणं ( काहींना जन्मत: कमी यूरिक अ‍ॅसिड ही समस्या जाणवते)
advertisement
कमी यूरिक अ‍ॅसिडचे दुष्परिणाम
- थकवा आणि अशक्तपणा: शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवते.
- कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती: रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असेल तर आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं.
- न्यूरॉलॉजिकल समस्या: कमकुवत स्मरणशक्ती, एकाग्रतेचा अभाव.
- ऑक्सिडेटिव्ह ताण: शरीरात मुक्त रॅडिकल्स वाढतात.
- यकृत आणि मूत्रपिंडावर परिणाम: अवयवांचे कार्य कमी होऊ शकतं.
- हृदयाच्या आरोग्यावर परिणाम: हृदयरोगांचा धोका वाढू शकतो.
advertisement
युरिक अ‍ॅसिडची योग्य पातळी किती असावी?
पुरुषांमध्ये: 3.4 ते 7.0 मिलीग्राम/डीएल
महिलांमध्ये: 2.4 ते 6.0 मिलीग्राम/डीएल
युरिक अ‍ॅसिडची पातळी यापेक्षा कमी झाली तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
कमी युरिक अ‍ॅसिड कसे टाळावे?
प्युरीनयुक्त संतुलित आहार घ्या (उदा. डाळी, मासे, अंडी)
advertisement
जास्त पाणी किंवा डिटॉक्स ड्रिंक्स पिणं टाळा.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घ्या.
नियमित आरोग्य तपासणी करा.
ताणतणाव आणि उपवास टाळा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Uric Acid : युरिक अ‍ॅसिड कमी होण्याचे शरीरावर होतात परिणाम, वाचा लक्षणं, कारणं आणि उपचार
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement