Collagen : कोलेजन म्हणजे काय ? त्वचेसाठी कोलेजन का महत्त्वाचं ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Last Updated:

कोलेजनमुळे त्वचा तरुण दिसते, त्वचा घट्ट राहते आणि सुंदर दिसते. त्वचेव्यतिरिक्त, स्नायू आणि हाडांनाही ताकदीसाठी कोलेजनची आवश्यकता असते. नैसर्गिकरित्या कोलेजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पती उपयुक्त ठरतात.

News18
News18
मुंबई : कोलेजन हा शब्द तुम्ही ऐकलाय का ? त्वचेसाठी हे महत्त्वाचं प्रथिन आहे. त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादनांपासून ते सोशल मीडियापर्यंत, कोलेजनबद्दल उल्लेख आढळतो. पण, कोलेजन म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व माहित नसतं
कोलेजन हे एक प्रकारचे स्ट्रक्चरल प्रोटीन आहे जे त्वचेचा 75 ते 80 टक्के भाग तयार करतं. कोलेजनमुळे त्वचा तरुण दिसते, त्वचा घट्ट आणि सुंदर दिसते. त्वचेव्यतिरिक्त, स्नायू आणि हाडांनाही ताकदीसाठी कोलेजनची आवश्यकता असते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कोलेजनची आवश्यकता असते. नैसर्गिकरित्या कोलेजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पती उपयुक्त ठरतात.
advertisement
पाहूयात या औषधी वनस्पती -
गोटुकोला - गोटुकोला किंवा मांडुकपर्णी वनस्पती आहे. टाइप 1 आणि टाइप 3 कोलेजन यामुळे सुधारतं. जखमा भरून काढण्यासाठी आणि ऊतींच्या पुनरुत्पादनात देखील हा उपाय प्रभावी आहे.
advertisement
आवळा - आवळ्यातलं व्हिटॅमिन सी कोलेजन वाढवण्यास मदत करतं. कोलेजन क्रॉस लिंकिंगसाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे.
ज्येष्ठमध - ऊतींना बरं करण्यासाठी, दुखापत बरी करण्यासाठी आणि कोलेजन टिकवून ठेवण्यासाठी ज्येष्ठमध उपयुक्त आहे.
अश्वगंधा - अश्वगंधामुळे तणाव कमी करण्यासाठी मदत होते. यामुळे कोर्टिसोल कमी होतं आणि कोर्टिसोलमुळे होणाऱ्या कोलेजनच्या नुकसानापासून त्वचेचं संरक्षण होतं.
advertisement
सुकामेवा आणि बिया - सुकामेवा आणि बियांमधे (सूर्यफुलाच्या बिया इ.) जस्त आणि व्हिटॅमिन ई असतं, यामुळे कोलेजन उत्पादन सुधारतं.
शतावरी - शतावरी या रसायनामुळे त्वचेला चांगलं पोषण मिळतं. त्वचेची लवचिकता वाढते आणि कोलेजन वाढतं.
advertisement
या आयुर्वेदिक औषधांच्या वापरासाठीही डॉक्टरांनी माहिती दिली आहे. या आयुर्वेदिक जिन्नसांची पावडर करून दिवसातून एकदा एक चमचा घेता येतो. एक ते तीन महिने रिकाम्या पोटी ही पावडर खाल्ल्यानं कोलेजन वाढवण्यात फायदा होतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Collagen : कोलेजन म्हणजे काय ? त्वचेसाठी कोलेजन का महत्त्वाचं ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement