Health Tips : स्वच्छतेच्या दैनंदिन सवयींचं महत्त्व, वाचा आयुर्वेदात मांडलेली उपयुक्तता

Last Updated:

आयुर्वेदानुसार, जेव्हा डोक्यावरील केस, मिशा किंवा नखं वाढतात तेव्हा शरीरावर अतिरिक्त भार जाणवतो. यामुळे थेट मानसिक आणि शारीरिक हालचालींवर परिणाम होतो. केस आणि नखं कापल्यानं शरीर हलकं वाटतं, ज्यामुळे ऊर्जा आणि कामात एकाग्रता वाढते.

News18
News18
मुंबई : एखादी गोष्ट वेळच्या वेळी करणं खूप आवश्यक असतं. मग ते महत्त्वाचे निर्णय असोत किंवा दैनंदिन गोष्टी. आयुर्वेदातही याच महत्त्व सांगितलं आहे.
आयुर्वेद हे केवळ उपचार करण्याचं शास्त्र नाही तर जीवनशैली संतुलित आणि निरोगी बनवण्यासाठीही  यात मार्गदर्शन केलं जातं. दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या सवयींचा शरीर आणि मनावर खोलवर परिणाम होतो. या सवयींपैकी एक म्हणजे वेळोवेळी केस आणि नखं कापणं.
आयुर्वेदानुसार, जेव्हा डोक्यावरील केस, मिशा किंवा नखं वाढतात तेव्हा शरीरावर अतिरिक्त भार जाणवतो. यामुळे थेट मानसिक आणि शारीरिक हालचालींवर परिणाम होतो. केस आणि नखं कापल्यानं शरीर हलकं वाटतं, ज्यामुळे ऊर्जा आणि कामात एकाग्रता वाढते.
advertisement
लांब नखं आणि अस्वच्छ केसांत धूळ, घाण आणि घाम सहज जमा होतो. या वातावरणात बॅक्टेरिया आणि बुरशी वाढते, ज्यामुळे संसर्ग आणि त्वचारोगांचा धोका वाढतो. नियमितपणे केस आणि नखं कापल्यानं या जीवाणूंचा संचय थांबतो आणि शरीर स्वच्छ आणि निरोगी राहतं.
advertisement
अदृश्य सूक्ष्मजीव बहुतेकदा लांब नखांच्या कडांवर वाढतात. हे जीवाणू अन्न शिजवताना किंवा चेहऱ्याला स्पर्श करताना शरीरात प्रवेश करू शकतात. आयुर्वेदात याला रोगांचं प्रवेशद्वार मानलं जातं. नखं लहान आणि स्वच्छ ठेवल्यानं संसर्ग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. त्याचप्रमाणे, मिशांची नियमित काळजी घेतल्यानं चेहऱ्याचं सौंदर्य वाढतच तसंच ओठ आणि नाकाभोवती स्वच्छता देखील राखली जाते.
advertisement
मन आणि शरीराच्या संतुलनावर आयुर्वेदात भर देण्यात आला आहे. केस आणि नखं वेळेवर कापणं हे फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर शरीराची स्वच्छता, आरोग्य आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी एक आवश्यक नियम आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपलं शरीर स्वच्छ ठेवते तेव्हा त्याची आभा आणि ऊर्जा दोन्ही वाढते असं आयुर्वेदात सांगण्यात आलंय. आयुर्वेदाच्या मते, ही आभा जीवनशक्ती (ओजस) मजबूत करते आणि दीर्घायुष्याचा आधार बनते.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : स्वच्छतेच्या दैनंदिन सवयींचं महत्त्व, वाचा आयुर्वेदात मांडलेली उपयुक्तता
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement